शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून एकाच दिवशी तब्बल ७९ जुगार अड्यावर धाडी

By अनिल गवई | Updated: May 9, 2023 13:21 IST

दारूबंदीच्या ९८ केसेस: अवैध दारू विक्रेत्यांच्याही आवळल्या मुसक्या

खामगाव -  जिल्हा पोलीसांनी उपविभागातील ठिकठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाडी घालून एकाच दिवशी तब्बल ७९ गुन्हे दाखल केले. यात ८५ पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आल्याचे समजते. त्यांच्याकडून जुगारात खेळल्या जाणार्या हजारो रूपयांसह अनेक मोबाईल सेट आणि जुगार खेळण्याचे इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्याचवेळी अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी एकाचवेळी तब्बल ९८ कारवाई करण्यात आल्या. यात ९१ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील अवैध जुगार तसेच दारूविक्रीला आळा घालण्यासाठी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाकडून धडक मोहिम राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील सर्वच पोलीस उपविभागातील अवैध जुगार अड्डे तसेच दारू िवक्रीची केंद्रे उध्वस्त करण्यात आलीत. प्रभारी पोलीस अधिक्षक तथा खामगाव येथील उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या नेतृत्वात हीधडकमोहिम राबिवण्यात आली. या मोहिमेत बुलढाणा उपविभागातील सर्वाधिक २५ जुगार तर ३३ दारूविक्रीच्या कारवाई करण्यात आल्या. त्यानंतर मलकापूर उपविभागात जुगार आणि दारू विक्रीच्या प्रत्येकी २० कारवाई करण्यात आल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर येत आहे.

आतापर्यंतची सर्वात मोठी धडक मोहिम

एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत मोठ्याप्रमाणात आरोपी अटक करण्यात आले. त्याचवेळी मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात राबविण्यात आलेली ही सर्वात मोठी मोहिम असल्याची चर्चा आहे. या मोहिमेमुळे अवैध जुगार व्यावसायिकांसोबतच दारू िवक्रेत्यांमध्येहीचांगलीच खळबळ माजली आहे.धडक मोहिमेत अशी झाली कारवाईबुलढाणा २५

मेहकर १६

मलकापूर २०

खामगाव ११

देऊळगाव राजा ०७

एकुण             ७९

दारू विक्री करणाऱ्यांच्याही आवळल्या मुसक्या

बुलढाणा ३३मेहकर १९

मलकापूर २०खामगाव १२

देऊळगाव राजा १२एकुण            ९६

अवैध धंद्यांना आळा घालण्यासोबतच दारू िवक्रीलाही पायबंद घालण्यासाठी बुलडाणा पोलीस दलाकडून शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी धडक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील ७९ जुगार अड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्याचवेळी ९६ दारू बंदीच्या कारवाई करण्यात आल्या. या कारवाईमुळे दारूविक्री सोबतच जुगाराला पायबंद घालण्यास निश्चितच मदत होईल. - अशोक थोरात, अपर पोलीस अधिक्षक तथा प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलढाणा.

टॅग्स :Policeपोलिस