शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाचे आगमन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:00 IST

चिंब पावसात ढोल- ताशांच्या निनादात जिल्हय़ात श्री  गणरायाचे आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस  झाल्यामुळे चिंब पावसात गणेश भक्तांनी वाजत - गाजत मिरवणूक  काढत श्री गणेशाची स्थापना केली. जिल्हय़ात एकूण ९४३  सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून,  यामध्ये शहरी भागात ३८५ तर ग्रामीण भागात ५५८ मंडळांनी श्री  गणेशाची स्थापना केली आहे. 

ठळक मुद्देपावसामुळे गणेश उत्सवात आले चैतन्य!२४८ गावात ‘एक गाव-एक गणपती’

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  चिंब पावसात ढोल- ताशांच्या निनादात जिल्हय़ात श्री  गणरायाचे आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस  झाल्यामुळे चिंब पावसात गणेश भक्तांनी वाजत - गाजत मिरवणूक  काढत श्री गणेशाची स्थापना केली. जिल्हय़ात एकूण ९४३  सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून,  यामध्ये शहरी भागात ३८५ तर ग्रामीण भागात ५५८ मंडळांनी श्री  गणेशाची स्थापना केली आहे.   o्री गणेशाच्या आगमनाची एका आठवड्यापासून जोरदार तयारी  सुरू होती. बुलडाणा शहरासह जिल्हय़ातील सर्व बाजारपेठा  सजल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच बुलडाणा शहरातील  बाजारात भाविकांची गणेश मूर्तीच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.  त्यानंतर सायंकाळी गणेश मंडळांनी मिरवणूक काढत श्री गणेशाची  स्थापना केली. गणेश भक्तांमध्ये दिवसभर उत्साह दिसत होता.  अनेक गणेश भक्तांनी एक दिवस अगोदर गणेश मूर्तींची खरेदी  केली, तरी शुक्रवारी सकाळपासूनच बुलडाणा आठवडी बाजारा तील महात्मा फुले चौक, कारंजा चौक, बाजार लाइन, आठवडी  बाजार मार्ग आदी परिसरात गणेशमूर्ती आणि पूजाअर्चा साहित्याची  खरेदी करण्यासाठी आबालवृद्ध भाविकांची वर्दळ होती. शहरा तील बाजारपेठ विविध फुलांच्या दुकानांनी सजली असल्याने  सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता. गणेशमूर्ती घेऊन जाताना  गणेशभक्त गणपती बाप्पा मोरया, अशा जोशामध्ये जयजयकार  करीत असल्याने वातावरण प्रफुल्लित झाले होते.   जिल्हय़ात या धार्मिक वातावरणात शांतता राखण्यासाठी  जिल्ह्याभरात  पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस  अधिकारी,  पोलीस कर्मचार्‍यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.  रात्री १0 वाजेपर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांकडून मूर्ती स्थापना  करण्यात आली. 

पावसामुळे गणेश उत्सवात आले चैतन्य!यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पावसाने दांडी  दिली. त्यामुळे जिल्हय़ातील सोयाबीन, तुरीसह अन्य पिके धोक्यात  आली होती. त्यामुळे यावर्षी पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लाग तो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र गत चार  दिवसांपासून जिल्हय़ात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांना  संजीवनी मिळाली आहे. पावसाने दांडी दिल्याने सर्वत्र नैराश्याचे  वातावरण होते. तसेच आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा  सामना करावा लागेल, अशी चिंता होती; मात्र या पावसामुळे  सर्वांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. गणेशाच्या स्थापनेदरम्यान  पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.   

२४८ गावात ‘एक गाव-एक गणपती’जिल्ह्यातील ‘एक गाव-एक गणपती’ या संकल्पनेतून २४८ गावा त एक गाव-एक गणपती बसविण्यात आला. सामाजिक सलोखा  आणि सर्वधर्म समभाव गावात कायम राहावा याकरिता तंटामुक्त  मोहीम व पोलीस प्रशासनाच्यावतीने एका गावात एकच  सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले  होते. याला २४८ गावातील नागरिकांनी प्रतिसाद देत एकच  सार्वजनिक गणपती बसविला.