शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

संतनगरी शेगावात २६८ भजनी दिंड्यांचे आगमन

By admin | Updated: April 3, 2017 03:13 IST

श्रीराम जन्मोत्सवसाठी २ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत २६८ भजनी दिंड्यांचे शेगावात आगमन झाले.

गजानन कलोरे शेगाव(जि. बुलडाणा), दि. २- श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा होत असून या उत्सवासाठी २ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत २६८ भजनी दिंड्यांचे शेगावात आगमन झाले.श्रीराम नवमी उत्सवनिमित्त श्री गजानन महाराज संस्थानमध्ये २८ मार्चपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. सकाळी ५ ते ६ काकडा, ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, रात्री ८ ते १0 किर्तन हे नित्यप्रमाणे होत आहे. मंदीर परिसरात सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई उत्सवासाठी करण्यात आली आहे. मंदीर परिसरात उत्सवादरम्यान गर्दी होईल हे लक्षात घेऊन वनवे (एकेरी मार्ग) करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांच्या सोयीसाठी निवास व्यवस्था ही अल्पदरात श्री मंदीर परिसर, भक्तनिवास संकुल ३,४,५,६, आनंद विहार, भक्तनिवास संकुल, आनंदसागर विसावा येथे भाविकांच्या सोयीकरिता असलेल्या खोल्या नियमानुसार उपलब्ध आहेत.रविवार रोजी हभप तुकाराम बुवा सखारामपुरकर यांचे किर्तन तर ३ रोजी श्रीरामबुवा ठाकूर, ४ रोजी हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे किर्तन होत आहे. श्रीराम नवमी ४ एप्रिल रोजी विष्णूबुवा कव्हळेकर यांचे सकाळी १0 ते १२ श्रीराम जन्मोत्सवाचे किर्तन होत आहे. या उत्सवात अध्यात्म रामायण स्वाहाकार यागास १ एप्रिल रोजी आरंभ झाला आहे. राक्षसभुवन येथील पोपट महाराज चौथाईवाले यांच्या वैदीक मंत्रोपच्चारात विधिवत पुजन अध्यात्म रामायण स्वाहाकार यागाचे पुजन होत आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील व विश्‍वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. दु.२ वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा, गज अश्‍वासह नगर परिक्रमा निघेल. ५ रोजी हभप जगन्नाथबुवा म्हस्के यांचे सकाळी ७ वाजता काल्याचे किर्तन व नंतर दहीहांडी गोपाळकाळा होणार आहे.