शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार प्रकरणातील आराेपीस अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST

बुलडाणा : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मात्र, ...

बुलडाणा : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मात्र, १५ दिवस उलटूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही़ त्यामुळे आराेपीस तत्काळ अटक करण्याची मागणी पीडित युवतीने केली आहे़

बुलडाणा शहरातील एका २३ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून सागर प्रकाश वैराळकर (रा़ गणेशनगर बुलडाणा) याने तिच्यावर वेळाेवेळी अत्याचार केला़ सदर युवतीने लग्न करण्यासाठी तगादा लावल्यानंतर आराेपीने लग्न करण्यास संमती दिली़ दाेन्ही कुटुंबाच्या संमतीने नाेंदणी विवाह ठरवण्यात आला हाेता़ मात्र, ठरलेल्या तारखेपूर्वीच सागर वैराळकर याने लग्न करण्यास नकार दिला़ त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बुलडाणा शहर पाेलिसांत १ एप्रिल राेजी फिर्याद दिली हाेती़ याप्रकरणी पाेलिसांनी सागर प्रकाश वैराळकर याच्यासह त्याच्या कुटुंबीयाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दखल केला आहे़ १५ दिवसांचा कालावधी उलटूनही पाेलिसांनी आराेपींना अटक केली नसल्याचा आराेप पीडित युवतीने पाेलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे़ याप्रकरणी आराेपीपासून मला धाेका असल्याने त्यांना तातडीने अटक करा,अशी मागणीही पीडित युवतीने निवेदनाद्वारे केली आहे़