शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्राची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:25 IST

Corona Vaccine १३ ही तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रांवर महिलांना कोविडची लस देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभागाने महिलांसाठी विशेष कोविड लसीकरण केंद्रांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रांवर महिलांना कोविडची लस देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. या १३ ही केंद्रांवर सरकारच्या निकषांनुसार ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटांतील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना हे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी केेले आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष लसीकरण सत्र राहील. चिखली ग्रामीण रुग्णालय, देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड प्राथमिक आरोग्य केंद्र, खामगावातील सामान्य रुग्णालय, लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही विशेष लसीकरण सुविधा राहील.याव्यतिरिक्त मलकापूर तालुक्यासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात, मेहकरसाठी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात, मोताळ्यासाठी बोराखेडी आरोग्य केंद्रात नांदुरा तालुक्यासाठी नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, शेगाव तालुक्यासाठी आडसूळ, संग्रामपूर तालुक्यासाठी सोनाळा आणि सिंदखेड राजा तालुक्यासाठी सिंदखेड राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे.

या महिला घेऊ शकतील लसशासन निकषांनुसार ६० वर्षांवरील महिला तसेच दुर्धर आजार असणाऱ्या ४५ ते ५९ वयोगटांतील सहविकार असलेल्या महिलांना ही लस दिली जाईल. शासनाने ठरवून दिलेल्या मधुमेह, उच्च रक्तदाव व अन्य असे २० आजार असणाऱ्या महिलांना ही लस दिली जाईल. याव्यतिरिक्त आरोग्य विभागातील तसेच फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या महिलांनाही या विशेष लसीकरण केंद्रावर लस दिली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसWomen's Day Specialजागतिक महिला दिनbuldhanaबुलडाणा