शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चाेरट्यांचा बंदाेबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:31 IST

बेलगाव तालुका मेहकर येथील पत्रकार दीपक देशमुख यांची दुचाकी अज्ञात चाेरट्यांनी ११ एप्रिल राेजी लंपास केली़ ही घटना ...

बेलगाव तालुका मेहकर येथील पत्रकार दीपक देशमुख यांची दुचाकी अज्ञात चाेरट्यांनी ११ एप्रिल राेजी लंपास केली़ ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली़ तरीही पाेलिसांना अजूनही चाेरट्यांचा शाेध घेता आलेला नाही़ गत काही दिवसांपासून परिसरात दुचाकी चाेरीच्या घटना वाढल्या आहेत़ पाेलिसांनी दुचाकी चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे़

धुळीमुळे पिकांचे नुकसान

धाड : परिसरात गत काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर अवजड वाहने जात असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ही धूळ रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांवर बसत असल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे.

नियमांचे उल्लंघन

अमडापूर : परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, ग्रामस्थांमध्ये काेराेनाविषयी गांभीर्यच नसल्याचे चित्र असून नियमांचे उल्लंघन हाेत आहे.

वीजदेयकांची सक्तीने वसुली, ग्राहक त्रस्त

किनगाव राजा : परिसरात गत काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या वतीने लाॅकडाऊनच्या काळातील थकीत असलेली वीज देयके वसूल करण्याची माेहीम सुरू आहे. माेठ्या प्रमाणात आलेली देयके भरण्यासाठी सर्वसामान्यांकडे आधीच पैसे नाहीत.

पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

धामणगाव बढे : परिसरातील पांदण रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल घरी आणता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, राेजगार हमी याेजनेतून पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निमखेड येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न

बुलडाणा : राष्ट्रीय शाश्वत अभियानांतर्गत जमीन आराेग्य पत्रिका सन २०२१ अंतर्गत निमखेड येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शेषराव पाटील हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी सहायक बी.जी. गडबे, देशमुख आदी उपस्थित हाेते.

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

देऊळगावराजा : तालुक्यातील रोहणा, टाकरखेड परिसरात १८ फेब्रुवारी राेजी झालेल्या पावसामुळे हरभरा, गहू, शाळू, मका, कांदा व फळबागांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही़

वीज जोडणी कापल्यास तीव्र आंदाेलन

किनगाव राजा : वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची व घरगुती वीज ग्राहकांची जोडणी तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. थकीत देयक असलेल्या ग्राहकांची वीज कापू नये तसेच अवाजवी देयके कमी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे़

रेशनवर निकृष्ट धान्याचे वितरण

बुलडाणा : स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित करण्यात येणारा मका आणि ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे़ सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने मजुरी करणाऱ्यांना स्वस्त धान्यावरच आपली उपजीविका भागवावी लागत आहे़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे़

बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

डाेणगाव : मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे, वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.

गॅस दरवाढ झाल्याने स्वयंपाक पुन्हा चुलीवर

बुलडाणा : गॅसच्या दरात माेठी वाढ हाेत असल्याने गृहिणी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र धामणगाव धाड परिसरात आहे. उज्ज्वला याेजनेतंर्गत अनेकांना माेफत गॅस मिळाला असला तरी दरवाढ झाल्याने गॅस परवडत नसल्याचे चित्र आहे.

अभ्यासिका सुरू करण्याची मागणी

बुलडाणा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात शासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. या लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कोणतीच अभ्यासिका सुरू नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.