देऊळगावराजा : गाव शिवारात असलेल्या दोन वस्त्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करुन झोपेत असलेल्या महिला-पुरुषांना गंभीर मारहाण करून २ लाख २३ हजार ८00 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदर घटना मंगळवारी रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. या घटनेतील पाच गंभीर जखमींना औरंगाबाद हलविले आहे.देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या डोंगराजवळ असलेले स्टोन क्रशर आणि बायगाव शिवारात असलेल्या डोंगराजवळच्या वस्तीवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. स्टोन क्रशरजवळ सुखदेव झिपा राठोड (वय ४५), बेबी सुखदेव राठोड (वय ४0) हे पती-पत्नी घराच्या अंगणात बाहेर झोपलेले असताना त्यांच्यावर दरोडेखोरांनी लाठय़ाकाठय़ांनी हल्ला चढवून गंभीर मारहाण केली; तसेच बेबी राठोड यांच्या अंगावरील मंगळसूत्र रिंग फूल, मोबाईलसह ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर डोंगराजवळ असलेल्या माजी सैनिक शिवाजी इंगळे यांच्या शेतातील घराकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. त्याठिकाणी कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली. दरोडेखोरांनी घराची झड ती घेऊन महिलांच्या अंगावरील दागिने, नगदी रक्कम ८७ हजार रुपये, सेव्हनपीस १0 हजार रुपये, गहुपोत ३0 हजार रुपये, पाटल्या १५ हजार, एकदाणी टापूस ४0 हजार रुपये असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये वरील दोन्ही घटनेत एकूण मुद्देमाल २ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी घेऊन पलायन केले.घटनेनंतर सुखदेव राठोड आणि शिवाजी इंगळे यांनी जखमी अवस्थेत पो.स्टे.मध्ये येऊन माहिती दिली. अंढेरा पोलिसांनी वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्याम दीघावकर, एसडीपीओ प्रवीण परदेशी यांनी जिल्ह्यात नाकाबंदी करुन घटनास्थळ परिसरात कोम्बींग ऑ परेशन राबवले. बुधवारी सकाळी श्वान राजाने अंढेरा गावाकडे मार्ग दाखवला. किनगाव राजा, लोणार, जानेफळ, अमडापूर, सिं.राजा, साखरखेर्डा आणि दे.राजा या पो.स्टे.चे ठाणेदार व कर्मचारी हजर झाल्याने अंढेरा पोलिस स्टेशनला छावणीचे स्वरूप आले आहे. या घटनेतील गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर औरंगाबादला हलविण्यात आले आहे.
दोन वस्त्यांवर सशस्त्र दरोडा
By admin | Updated: June 26, 2014 02:04 IST