शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे क्षेत्र वाढले; सिंचनाची सोय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:23 IST

शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे; परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडल्याने खामगाव तालुक्यात रब्बीचे क्षेत्र वाढले, मात्र पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा मिळताना दिसत नाही. एकीकडे प्रकल्पांमध्ये पाणी आहे, मात्र अद्याप शेतापर्यंत पोहचले नसल्याचे दिसून येते. सिंचनासाठी पाण्यासोबतच वीजेचाही प्रश्न आहे. रात्रीच्या वेळी वीज सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांना थंडीत ओलीत करावे लागते. महावितरणने दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.गत काही वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने खामगाव परिसरातील सर्वच प्रकल्पांमधील पाणी पातळी घटली होती. जिथे पिण्याच्या पाण्याचीच टंचाई आहे; तिथे सिंचनाला पाणी मिळणे कठीण होऊन बसले होते. मात्र यावर्षी सगळीकडेच प्रचंड पाऊस पडला, त्यामुळे सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. खामगाव तालुक्यातील पावसाची सरासरी ६४० मिलीमिटर एवढी आहे. परंतु गत काही वर्षांपासून केवळ निम्मेच पाऊस पडत होता. यावर्षी मात्र ८२४ मिलीमीटर एवढा म्हणजेच तब्बल दीडपट पाऊस पडला. परिणामी यावर्षी पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न मिटला. परंतु शेतकºयांच्या बांधापर्यंत अजुनपर्यंत पाणी पोहचलेले दिसत नाही. खामगाव तालुक्यात यावर्षी रब्बीचा पेरा वाढला आहे. सुमारे २८ हजार हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यात हरभरा, गहू, कांदा, व मका पिकांचा समावेश आहे. यावर्षी विहीरींचीही पाणी पातळी बºयापैकी वाढल्याने सर्वच पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात हरभरा बहरला आहे. परंतु पिकाला पाणी देण्यासाठी प्रकल्पांमधून पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही.पाटचºयांची स्वच्छता, दुरूस्तीची कामे प्रलंबित असल्यामुळे शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकलेले नाही. खामगाव तालुक्यात मन आणि मस या प्रकल्पांमधून शेतकºयांच्या शेतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. तर तोरणा व ज्ञानगंगा प्रकल्पातून नदी पात्रात पाणी सोडण्यात येते. यानंतर शेतकरी नदीत मोटारी बसवून पाण्याचा उपसा करतात. दरम्यान मन व मस या प्रकल्पातून आतापर्यंत पाटचºयांद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे रब्बीच्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याचे दिसून येते. सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांच्या शेतापर्यंत पाणी सोडण्याची त्वरीत व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. वीज उपलब्ध करून द्या!एकीकडे प्रकल्पांमधून शेतापर्यंत पाणी पोहचले नाही, तर दुसरीकडे वीजेचीही समस्या आहे. अनेक भागात केवळ रात्रीच वीज पुरवठा सुरू करण्यात येत असल्याने शेतकºयांना रात्री थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. दुसरीकडे काही भागातील विद्यूत रोहित्रांचा प्रश्न आहे. काही रोहित्र बंद आहेत, तर काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेतकºयांना रात्री ऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी तसेच रोहित्रांचाही प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगावFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पmahavitaranमहावितरण