दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, मेहकर, शेगाव, मलकापूर आणि देऊळगाव राजा येथे दररोज किमान ८० ते १०० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होतील, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून, या ठिकाणी १ कोटी ४० लाख रुपये खर्च करून पाच ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, येत्या आठ दिवसात प्रत्यक्षात हे ऑक्सिजन प्लांट उभे राहणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. इंग्लंडस्थित एका कंपनीकडून हे ऑक्सिजन प्लांट बुलडाणा जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
--वेळेआधी ऑक्सिजनची नोंदणी गरजेची
जिल्ह्यातील ३२ खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजनची गरज असून, या रुग्णालयांकडून अचानक ऑक्सिजनची मागणी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी वेळेआधी नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना गरजेनुरूप ऑक्सिजन उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच खासगी रुग्णालयांना दररोज सरासरी ऑक्सिजनच्या ३०० सिलिंडरची गरज भासते. त्याच्या सुरळीततेसाठीही एक समिती नियुक्त करण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.