शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकांच्या नियुक्तीने ग्रामपंचायत विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 11:29 IST

प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली नसून ग्रामपंचायतच्या विकासाला खीळ बसत आहे.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र पदभार घेतल्यानंतर प्रशासकांनी ग्रामपंचायतकडे पाठ फिरविली आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली नसून ग्रामपंचायतच्या विकासाला खीळ बसत आहे.जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने त्या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, कृषि अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पातील पर्यवेक्षिकांची नियुक्ती करण्यात आली.यापैकी काही अधिकाऱ्यांकडे एक तर काहींचीे तीन ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाºयांनी गावात जाऊन पदभार स्वीकारला आहे. मात्र, त्यानंतर गावात प्रशासक फिरकलेच नसल्याच्या तक्रारी माजी सरपंच तसेच गावकºयांनी केल्या आहेत.प्रशासकपदी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाºयांकडे आधीच अनेक कामे आहेत. त्यातच ते व्यस्त असतात. सोबतच त्यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण अधिकच वाढला आहे. सध्या कोरोनामुळेही अनेक कामे वाढली आहे. त्यामुळे अधिकारी ग्रामपंचायतकडे जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नाल्या तुंबल्या आहेत. मात्र नाले सफाई किंवा रस्त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे गावगाड्याचा कारभार सध्या प्रभावीत झाला आहे.प्रशासक गावात येतच नाहीत. त्यामुळे गावातील विकासकामे ठप्प आहेत. गावकºयांचीही अनेक कामे रखडली आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसला आहे. निवडणूक लवकरात लवकर घ्यायला हवी, अशी आमची मागणी आहे.- रवी महालेजिल्हा कार्याध्यक्ष सरपंच संघटना बुलडाणा

अधिकारी कमी व गावे जास्त आहेत. त्यामुळे काही अधिकाºयांकडे तीन गावांचे प्रशासकपद देण्यात आले आहे. अधिकारी कामाच्या प्राधान्यानुसार काम करीत आहेत. गावात महत्वाचे काम असले तर प्रथम गावात जातात.- चंदनसिंग राजपूतगटविकास अधिकारी, पंचायत समिती खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायत