शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

पश्चिम विदर्भातील २२ लाख दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:34 IST

बुलडाणा: दुष्काळाची दाहकता वाढलेली असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव व्यापाºयांनी गगनाला भिडवले आहेत.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: दुष्काळाची दाहकता वाढलेली असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव व्यापाºयांनी गगनाला भिडवले आहेत. दोन महिन्यात ढेपीच्या ६० किलोच्या पोत्यामागे सुमारे ७०० रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने पश्चिम विदर्भातील २२ लाख ५० हजार दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाºयावर भागवली जात आहे. परिणामी दुग्धोत्पादनालाही फटका बसत आहे. दुभत्या जनावरांच्या खाद्यपदार्थाकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढण्यासाठी मोठा फायदा होतो. त्यामध्ये प्रथिनेयुक्त खाद्य जर त्यांना मिळाले तर गायी, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतू सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहेत. दुधाळ जनावरांसाठी सर्वात जास्त सरकीच्या ढेपची विक्री पश्चिम वºहाडात होते. पशुखाद्य शास्त्रानुसार दुभत्या जनावरांना खुराक म्हणून सरकीची ढेप दिवसाकाठी एक ते दीड किलो देणे आवश्यक असते. सरकीची ढेप दुधाळ जनावरांना दिल्यास दुधात वाढ होऊन गुरांची भूकही चांगल्या प्रकारे भागविल्या जाते.  त्यासाठी खामगाव येथे तयार होणारी ढेप सर्वत्र प्रसिद्ध असून खामगाव येथून जिल्ह्याबाहेरही ढेपची निर्यात केली जाते. फेब्रुवारीमध्ये ढेपीच्या ६० किलोच्या एका पोत्यासाठी १२०० रुपये मोजावे लागत होते. मात्र गत दोन महिन्यात यामध्ये ७०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या ढेपीच्या ६० किलोच्या एका पोत्यासाठी १ हजार ९०० रुपये लागत आहेत. तर हिरवा चाराही दुधाळ जनावरांना देणे अवघड झाले आहे. याचा परिणाम म्हणून मिळणारे दूधही कमी झाल्याचे दिसून येते.  यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक गायी-म्हशीअमरावती विभागामध्ये एकूण २२ लाख ५० हजार ५० गायी व म्हशींची संख्या आहे. त्यामध्ये सर्वाधिक गायी-म्हशी यवतमाळ जिल्ह्यात दिसून येतात. यवतमाळमध्ये एकूण ६ लाख ८८ हजार ५०० त्यापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार ७३३ गायी-म्हशींची संख्या आहे. अमरावती जिल्ह्यात ५ लाख १२ हजार ६०, अकोला जिल्ह्यात २ लाख ४० हजार १९५ व वाशिम जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ५६२ गायी-म्हशी आहेत.  बोंडअळीचा डंख सरकीच्या ढेपेवरमागीलवर्षी कापरीवर पडलेल्या बोंडअळीचा डंख सरकीच्या ढेपे दिसून येत आहे. राज्यात गतवर्षी ४२ लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत बीटी कापसाची लागवड करण्यात आली होती. त्यात २० जिल्ह्यांत बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने सुमारे ५ लाखावर शेतकºयांचे नुकसान झाले होते. बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन घटले परिणामी सरकीच्याही उत्पादनावर फटका बसला. सरकीची आवक कमी झाल्याने सरकीच्या ढेपेचे भाव वाढले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा