शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
3
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
4
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
5
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
7
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
8
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
9
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
10
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
11
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
12
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
13
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
14
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
15
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
16
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
17
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
18
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
19
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
20
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा

तक्रार करण्याच्या उदासीनतेमुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अडगळीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 02:47 IST

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत राज्यात २२८ गुन्हे तर बुलडाण्यात पाच गुन्हे दाखल.

बुलडाणा, दि. २0 - अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज असून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तक्रार देणार्‍यांनी पुढे येणे गरजेचे आहे; मात्र याबाबत तक्रार देणारे पुढे येत नसल्यामुळे तसेच पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्यामुळे जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्यात २२८ गुन्हे दाखल आहेत. अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व पिशाच बाधा इत्यादींमुळे तसेच, भोंदूबाबा यांच्याकडून समाजातील सामान्य जनतेचे मानसिक, शारीरिक वा आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना फार मोठय़ा संख्येने उघडकीस येत असून हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. जादूटोणा करणार्‍या व्यक्ती, भोंदूबाबा यांचा आपल्याकडे चमत्कारी उपाय किंवा शक्ती असल्याचा खोटा दावा आणि यांची समाजविघातक व नुकसानकारक कृत्ये यांमुळे समाजाची घडीच विस्कटण्याचा आणि अधिकृत व शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यांवरील सामान्य जनतेच्या विश्‍वासाला तडा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि या अंधविश्‍वासामुळे व अज्ञानामुळे ते अशा भोंदूबाबा आणि जादूटोणा करणार्‍या व्यक्तींचा आश्रय घेत आहेत. अशा परिस्थितीत, जादूटोणा करणार्‍या या व्यक्ती, भोंदूबाबा यांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडण्यापासून सामान्य जनतेला वाचवणे व अशा अनिष्ट परिणामांना आळा घालण्यासाठी तसेच महाराष्ट्र जादूटोणा, अनिष्ट आणि अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एप्रिल १00५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेने कायदा मंजूर केला होता; मात्र या काद्यांतर्गत फिर्यादी तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे भोंदूबाबा तसेच जादूटोणा करणारे फायदा घेत आहेत. या कायद्यान्वये यावर्षी जिल्ह्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्यात २२८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जादूटोणा कायद्यानुसार दाखल झालेले गुन्हे या कायद्यान्वये पहिला गुन्हा बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असून फिर्यादी रणजितसिंग राजपूत तर आरोपी होते स्वामी परस नंगगिरी, दुसरा गुन्हा चिखली पोलीस स्टेशन, फिर्यादी प्रतिभा भुतेकर, आरो पी हरिदास ऊर्फ नागनाथबाबा, तिसरा गुन्हा बुलडाणा पोलीस स्टेशन फिर्यादी अजय माहुले तर आरोपी शक्ति प्राशन औषध कंपनीचे उत्पादक, वितरक इतर, दिल्ली, चौथा गुन्हा बुलडाणा पोलीस स्टेशन, फिर्यादी देवीदास कंकाळ, आरोपी वसंत दौलत जाधव, पाचवा गुन्हा लोणार पोलीस स्टेशन फिर्यादी सोहेम शर्मा व अरोपी शेख अकील, शेख हरुण इतर.जिल्ह्यातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मोठय़ा प्रमाणात भोंदूबाबा व जादूटोणा करणार्‍याविरुद्ध तक्रारी येतात; मात्र पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी फिर्यादी पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण कमी आहे. यासाठी पोलिसांनी सहकार्य करून समाजात जनजागृतीची गरज आहे.-प्रा. प्रतिभा भुतेकर, महिला संघटक, अंनिस, बुलडाणा.