शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ४५ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 17:30 IST

Coronavirus News कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता १७२ झाली आहे.

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २९२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, चिखली येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी, कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता १७२ झाली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये सिंदखेड राजा दोन, रायपूर एक, बुलडाणा नऊ, देऊळगाव राजा ९, देऊळगाव मही तीन, शेगाव तीन, जवळपा एक, इटखेड एक, कारखेड एक, घाटपुरी एक, खामगाव पाच, मलकापूर दोन, जांभूळ धाबा दोन, दाताळा दोन, पिंपळगाव काळे एक, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान, चिखली येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ६९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात चिखली कोविड केअर सेंटरमधील २२, देऊळगाव राजा येथील दोन, खामगाव येथील १७, बुलडाणा येथून १६, शेगाव चार, जळगाव जामोदमधून एक, संग्रामपूरमधून एक आणि मलकापूर कोविड केअर सेंटरमधील पाच जणांचा समावेश आहे. आतापर्यंत एक लाख १२ हजार ४०२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर कोरोनाबाधितांपैकी १३ हजार ८०५ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

१०३८ संदिग्धांच्या अहवालांची प्रतीक्षा

तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालापैकी अद्यापही १०३८ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४ हजार ३१९ झाली असून यापैकी सक्रिय रुग्ण असलेल्या ३४२ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे १७२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा