शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ८२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:16 IST

CoronaVirus In Buldhana जिल्ह्यात आतापर्यंत १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४३० जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले.  त्यापैकी ३४८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील एका ५५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ३७, सुंदरखेड येथील एक, गिरडा येथील एक, दहीद येथील एक, चांडोळ येथील एक, हिवरा येथील एक, अमडापूर येथील एक, धोत्रा भणगोजी येथील एक, हातणी येथील एक, चिखली येथील ११,  देऊळगाव राजा  एक, सिनगाव जहागीर दोन, देऊळगाव मही एक, लोणार चार, सिंदखेड राजा दोन, रुम्हणा एक, शेंदुर्जन एक, मेहकर शहर चार, गुंधा एक, मुंदेफळ एक, डोणगाव दोन, नांदुरा  एक, झाडेगाव एक आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथील एक, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील दोन जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे. असा प्रकारे ८२ जण मंगळवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुसरीकडे उपचारादरम्यान मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत ७६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख १५ हजार ९५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच १४ हजार २२१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात कोरोना मृत्यूदरही आता वाढत असून ११ टक्क्यावरून तो १२ वर पाहोचला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या