बुलडाणा जिल्ह्यात आणखी  एकाचा मृत्यू; ५८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 10:28 AM2021-02-09T10:28:24+5:302021-02-09T10:28:39+5:30

CoronaVirus News नांदुरा येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Another death in Buldana district; 58 corona positive | बुलडाणा जिल्ह्यात आणखी  एकाचा मृत्यू; ५८ कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात आणखी  एकाचा मृत्यू; ५८ कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३०४ अहवाल सोमवारी प्राप्त झाले. त्यापैकी  २४६ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५८ अहवाल पॉझिटिव्ह  आले. दुसरीकडे, नांदुरा येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतकांची संख्या आता १७३ झाली आहे.
पॉझिटिव्ह  आलेल्यांमध्ये  मलकापूर ४, निमखेडी १, बुलडाणा १३, वरवंड ३,  कारखेड २, केळवद १, अमडापूर १, दिवठाणा १, सावरगाव डुकरे ३, साखरखेर्डा १, राजेगाव १, चिखली ७, देऊळगाव राजा १०, निवडुंगा ३,  गव्हाण १, दे. घुबे १, देऊळगाव मही ३, जवळखेड १, अकोला देव १ या प्रमाणे ५८ जण कोरोनाबाधित आढळून आले. सोबतच नांदुरा येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. दुसरीकडे सोमवारी ४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात खामगावा कोविड केअर सेंटरमधून १०, देऊळगाव राजा कोविड केअर सेंटरमधून १३, चिखलीमधून २, मेहकरमधून १, सिंदखेड राजा येथून ६, मोताला येथून ६, मलकापुरातून २, शेगावातून ६ आणि बुलडाण्यात ३ जणांना सुटी देण्यात आली.
तसेच आजपर्यंत  १ लाख १२ हजार ६४८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १३,८५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अद्यापही ९६४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण  कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ३७७ झाली आहे.

Web Title: Another death in Buldana district; 58 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.