शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३३ कोरोना पॉझिटीव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:41 IST

सोमवारी आणखी ३३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी ३३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच २९४ अहवाल निगेटीव्ह आले असून  १०८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३२७ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३२ व रॅपिड टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे.       पॉझिटीव्ह आलेले रुग्णांमध्ये  मलकापूर शहरातील तीन ,मलकापूर तालुक्यातील  दुधलगांव येथील एक, शेगांव शहरातील एक,  शेगांव तालुक्यातील निंबा येथील एक, माटरगांव १, खामगांव शहर २, खामगांव तालुका  टेंभुर्णा १, घाटपुरी २, मोताळा शहरातील एक ,  लोणार तालुका  रायगांव येथील एक, जळगांव जामोद शहर १, जळगांव जामोद तालुका  आसलगांव २, इस्लामपूर १, बुलडाणा शहर ८, मेहकर तालुका  दुधलगांव १, सिं. राजा तालुका   साखरखेर्डा २, पळसखेड चक्का १,  चिखली शहर १, चिखली तालुका  गुंजाळा १, सवणा  येथील एका रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज   बुलडाणा आयुर्वेद महाविद्यालय ७, अपंग विद्यालय २,  नांदुरा ५,  चिखली ११, लोणार  १८, मेहकर ९,  सिं. राजा १५, दे. राजा १६, मोताळा ८, शेगांव ४,  खामगांव ९, मलकापूर ४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत ३४ हजार ५६६ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच आजपर्यंत ७ हजार ५०३ कोरोना बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.   १८७ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहे.जिल्ह्यात  आजअखरे ८ हजार ९२ कोरोना बाधीत रुग्ण आहेत.  त्यापैकी ७ हजार ५०३  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात ४८३ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १०६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या