शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२७५0 कोटींचा वार्षिक आराखडा तयार

By admin | Updated: April 1, 2017 02:21 IST

बुलडाणा जिल्हा नियोजन; पीक कर्जासाठी भरीव तरतूद.

बुलडाणा, दि. ३१- जिल्ह्याचा २0१७- १८ वर्षाकरिताचा २७५0 कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पीक कर्जासाठी १४५0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, जिल्हाधिकारी विजय झाडे यांच्या हस्ते शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आराखड्याचे विमोचन करण्यात आले.बुलडाणा जिल्ह्याचा २0१७ - १८ चा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये १४५0 कोटी रुपयांची अधिकाधिक रक्कम पीक कर्जासाठी देण्यात आली आहे. यातील १३५६ कोटी खरीप, तर १0२ कोटी रुपयांची तरतूद रब्बी पीक कर्जासाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या पीक कर्ज घेण्याकरिता पात्र शेतकरी १ लाख ३६ हजार आहेत. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील बिगर कर्जदार नोंदणीकृत शेतकर्‍यांची संख्या १ लाख ७९ हजार आहे. १ एप्रिल २0१७ रोजी ६३ हजार ५२९ शेतकरी पीक कर्जासाठी पात्र ठरणार असून, १ जुलै २0१७ रोजी ६८ हजार ४ शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना नवीन कर्ज घेण्याकरिता ३१ जूनपूर्वी पीक कर्जाची रक्कम घेण्याची गरज आहे. यासोबतच दीर्घ मुदत, मध्यम मुदत शेती कर्जासाठी ३३५ कोटी, सूक्ष्म- मध्यम व लघू व्यावसायिकांसाठी २0१ कोटी, शैक्षणिक कर्जासाठी २0.१६ कोटी, गृह कर्जासाठी प्रधानमंत्री आवास योजना विशेष प्राधान्याकरिता २६८.७८ कोटी व अन्य बाबींसाठी ४६५.५0 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अन्य बाबींमध्ये जिल्हा उद्योग केंद्र २९ कोटी तसेच महिला बचत गटांसाठी २९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्याचा २0१७ - १८ चा वार्षिक पतपुरवठा आराखडा पुस्तिकेचे विमोचन करताना दुय्यम निबंधक पालोदकर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक पी. एन. श्रोते, जिल्हा बँकेचे सीईओ अशोक खरात, जिल्हा विकास प्रबंधक सुभाष बोंदाडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे राजेश परब, ग्रामीण बँकेचे टी.एफ. वानखडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या सोनाली देवरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रवीण कुरमे, ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे संचालन प्रणय सावजी यांची उपस्थिती होती.