शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उपसभापती पदासाठी फेरनिवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:28 IST

चिखली पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक गत १४ मार्च २0१७ रोजी पार पडली होती. ही निवडणूक प्रक्रिया अवैध ठरविण्यात आल्याने या पदासाठी फेर निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी तहसीलदार चिखली यांना दिले आहेत.  त्यानुसार १ सप्टेंबर २0१७ रोजी उपसभापती पदासाठी फेर निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तर फेरनिवडणुकीचे वृत्त कळताच पं.स. वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देचिखली पंचायत समितीराजकीय समीकरणे बदलणार

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: चिखली पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक गत १४ मार्च २0१७ रोजी पार पडली होती. ही निवडणूक प्रक्रिया अवैध ठरविण्यात आल्याने या पदासाठी फेर निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी तहसीलदार चिखली यांना दिले आहेत.  त्यानुसार १ सप्टेंबर २0१७ रोजी उपसभापती पदासाठी फेर निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तर फेरनिवडणुकीचे वृत्त कळताच पं.स. वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.एकूण १४ सदस्य संख्या असलेल्या चिखली पंचायत समितीमध्ये सद्यस्थितीत भाजपा ७, काँग्रेस ५, शेतकरी संघटना १ आणि शिवसेना १ असे पक्षीय बलाबल आहे. एकूण सदस्य संख्या पाहता कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सभापती आणि उपसभापती पदासाठी गत १४ मार्च २0१७ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणूक प्रक्रियेत सभापती पदासाठी झालेल्या मतदानात सदस्यांचे संख्याबळ कमी असतानाही काँग्रेसने बाजी मारल्याने काँग्रेसच्या संगीता संजय पांढरे सभापतीपदी विराजमान झाल्या होत्या. तर अटीतटीची ठरलेल्या या लढतीसाठी भाजपाचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने सभागृहामध्ये १३ सदस्य उपस्थित राहिले होते. तसेच उपसभापती पदासाठी एका उमेदवाराचा अर्ज उशिरा प्राप्त झाल्याने उपसभापती पदावर भाजपाचे जितेंद्र कन्हैयालाल कलंत्री हे अविरोध निवडून आले होते. दरम्यान, उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक प्रक्रिया पारदश्रीपणे राबविली नसल्याचा ठपका ठेवत या  निवडणुकीस अवैध ठरवून फेरनिवडणूक घेण्याबाबत तक्रार शिवसेनेच्या वैशाली प्रभाकर कर्‍हाडे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे उपसचिव यांचे पत्र आणि विभागीय आयुक्त अमरावती यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी तहसीलदार चिखली तसेच पं.स. संवर्ग विकास अधिकारी यांना चिखली पंचायत समितीच्या उपसभापती पदाची फेरनिवडणूक घेण्याचे आदेश जारी केले आहेत. या निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, १ सप्टेंबर २0१७ रोजी सकाळी १0 ते दुपारी १२ वाजेपर्यंत उपसभापती पदाकरिता नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार येऊन याची दिवशी दुपारी २ वाजता उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या सभेच्या कामकाजास सुरुवात होणार आहे.