शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

इंग्रजीमुळे अंगणवाडी सेविकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:42 IST

Anganwadi workers in trouble due to English : ॲपवर मराठी भाषा नसल्याने अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : केंद्र शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना पोषण आहाराशी संबंधित माहिती भरण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या ॲपवर मराठी भाषा नसल्याने अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहेत. ॲपवर इंग्रजी व हिंदी या दोनच भाषांचा समावेश असल्याने माहिती भरताना अंगणवाडी सेविकांची दमछाक होत आहे.जिल्ह्यातील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंबंधी दैनंदिन माहिती ऑनलाइन व्हावी, यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइल रिचार्जची रक्कम देऊनही माहिती मोबाइल ॲपवर मराठीतून भरली जात असे. मात्र, १ एप्रिलपासून केंद्र शासनाच्या वतीने ही माहिती भरण्यासाठी कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये पोषण ट्रॅकर ॲप इंग्रजी व हिंदी भाषेतून देण्यात आले आहे. या ॲपमध्ये माहिती समावेशित केलेल्या लाभार्थींना लाभ दिला जाईल, अशा सूचना दिलेल्या आहेत; परंतु या पोषण ट्रॅकर सॉफ्टवेअरमध्ये मराठी भाषेचा उल्लेख नाही. सर्व माहिती इंग्रजी व हिंदी भाषेत आहे. त्यामुळे ही माहिती भरून घेण्यासाठी त्यांना इंग्रजी भाषा येणाऱ्या व्यक्तीचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागात इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने या कामात व्यत्यय येत आहे. दरम्यान, मोबाइल रिचार्जचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा काम ठप्प होते. अंगणवाडी सेविकांनी नवीन ॲपवर माहिती भरण्यासाठी मराठी भाषेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अंगणवाडी सेविकांनी मागणी केली आहे. दरम्यान, अंगणवाडी सेवामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बाल कल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले. पूर्वी अंगणवाडी सेविकांना सर्व माहिती रजिस्टरमध्ये नोंद करावी लागत असे. मात्र आता अंगणवाडी सेविका मोबाइलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती प्रणालीद्वारे केली जाणार आहे. स्मार्टफाेनमध्ये कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर असून, यातून सर्व उद्दिष्ट पूर्ण होणार आहेत. मात्र आता भाषेचा प्रश्न निर्माण झाल्याने अंगणवाडी सेविकांची डोकेदुखी वाढली आहे.

लाभार्थींचा मोबाइल क्रमांक केला अनिवार्य  पोषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरताना समस्या निर्माण होत असून, त्यातच लाभार्थीचा मोबाइल क्रमांक अनिवार्य केल्याने ज्या लाभार्थीकडे मोबाइल नाही, त्यांना अडचणी येत आहेत.  काही लाभार्थींची माहिती या ॲपमध्ये समाविष्ट झाली नाही, तर त्यांना पोषण आहाराचा लाभ न मिळाल्यास त्यांचा रोष अंगणवाडी सेविकांवर येऊ शकतो. त्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र