शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतील पोषण आहार सेविकांच्या घरी! बालके पोषण आहारापासून वंचित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:07 IST

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात कित्येक अंगणवाडीतील पोषण आहार हा सेविकेच्या घरीच पडून असून, तो ० ते ३ वर्षांखालील बालकांना वितरित केल्या जात नाही. त्यामुळे ती बालके वंचित राहतात. उलट गरजू महिलांची दमदाटी करून सर्व पोषण आहार घरीच पचविल्या जातो, असा आरोप माधव नाईक आणि रामेश्वर मंडळकर यांनी महिला व बालकल्याण विकास अधिका-यांकडे केला आहे. 

ठळक मुद्देमहिला, बाल विकास अधिका-यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात कित्येक अंगणवाडीतील पोषण आहार हा सेविकेच्या घरीच पडून असून, तो ० ते ३ वर्षांखालील बालकांना वितरित केल्या जात नाही. त्यामुळे ती बालके वंचित राहतात. उलट गरजू महिलांची दमदाटी करून सर्व पोषण आहार घरीच पचविल्या जातो, असा आरोप माधव नाईक आणि रामेश्वर मंडळकर यांनी महिला व बालकल्याण विकास अधिका-यांकडे केला आहे. साखरखेर्डा येथे १७ अंगणवाडी असून, क्रमांक ६ मधील अंगणवाडी ही भोगावती नदीकाठी समाज मंदिरात भरते; परंतु त्या अंगणवाडीत सेविका कधीच हजर राहत नाही. या अंगणवाडीसंबंधी माहिती मिळावी म्हणून माधव नाईक आणि रामेश्वर मंडळकर यांनी माहितीच्या अधिकारात सिंदखेड राजा बाल विकास प्रकल्प अधिकाºयांकडे माहिती मागितली; परंतु त्यांना अद्याप कार्यालयाकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. १ मार्च रोजी जि.प.प्राथमिक शाळेतील शिक्षकाकडून ० ते ३ आणि ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या पोषण आहारसंबंधी माहिती घेण्याचे आदेश दिले होते; परंतु स्थानिक शिक्षकांनी अवघ्या काही मिनीटात अहवाल तयार केला. ० ते ३ वयोगटातील बालकांना कोणत्याही प्रकारे पोषण आहार मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली. उलट तक्रारकर्त्यांचीच दमदाटी करण्यात आली. क्रमांक सहाच्या अंगणवाडी सेविकेच्या घरातून मागच्या बाजूला पोषण आहाराचीच पाकिटे आढळून आली. त्यामुळे संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी क्रमांक ६ या अंगणवाडीची चौकशी करावी, अशी मागणी माधव नाईक आणि रामेश्वर मंडळकर यांनी महिला व बालकल्याण विकास अधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाfoodअन्न