शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार, एक जखमी

By निलेश जोशी | Updated: December 22, 2023 23:59 IST

तळणी ते दाभाडी मार्गावरील घटना

नीलेश जोशी, बुलढाणा-मोताळा: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार २२ डिसेंबरच्या संध्याकाळी तळणी ते दाभाडी मार्गावर घडली. शेख रशीद शेख कालु व शेख अमीन शेख हनिफ (दोघे रा. माकोडी )अशी या अपघातामधील मृतकांची नावे आहेत.

मोताळा तालुक्यातील माकोडी येथील शेख रशीद शेख कालु, शेख अमीन शेख हनिफ व शेख सलीम शेख कालु हे तिघे जण एका दुचाकीद्वारे (क्रमांक एमएच-२८- बीएम-२१७३) या वाहनाने मलकापूरहुन माकोडी येथे घराकडे जात होते.

दरम्यान, तळणी - दाभाडी मार्गावरील खडकपूर्वा परिसरात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात शेख रशीद शेख कालु यांचा जागीच मृत्यु झाला तर, शेख अमीन शेख हनिफ व शेख सलीम शेख कालु हे दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ उपचारासाठी मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शेख अमीन शेख हनिफ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी शेख सलीम शेख कालु यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका चारचाकी वाहनाने या दुचाकीला धडक दिली, अशी चर्चा घटनास्थळी होती.

अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस स्टेशनचे पीएसआय विजयकुमार घुले, पीएसआय अनिल भुसारी, पोलिस कॉन्स्टेबल सुनील थोरात, रामदास गायकवाड व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासोबतच मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने माकोडी गावसह परिसरात शोककळा पसरली आहे. रुग्णालयासह घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. वृत्त लिहेपर्यंत बोराखेडी पोलिसांची कार्यवाही सुरू होती.

टॅग्स :Accidentअपघात