शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात शिक्षकाची अश्लील चित्रफीत काढून चार लाखांची मागितली खंडणी

By निलेश जोशी | Updated: June 19, 2023 18:04 IST

शिक्षकाला मारहाण करत त्याच्याकडून दहा हजार रुपये बळजबरीने काढून घेण्यात आले आहेत.

बुलढाणा: चिखली शहरातील एका २४ वर्षीय शिक्षकाला ट्रममध्ये अडकवून त्यांचे एका युवकासोबतच्या अश्लिल चाळ्यांची चित्रफीत काढत चार लाख रुपायंची खंडणी मागितल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात शिक्षकाला मारहाण करत त्याच्याकडून दहा हजार रुपये बळजबरीने काढून घेण्यात आले आहेत. प्रकरणी शिक्षकाने बुलढाणा शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ जून रोजी हा प्रकार घडला होता. प्रकरणी शिक्षकाने रात्रीच तक्रार दिली होती.

चिखली शहरात राहणारे शिक्षक विवेक सखाराम ढोकणे (२४) यांनी अनुषंगीक तक्रारीत म्हंटले आहे की, एका ॲपवरून त्याची बुलढाणा येथील ऋषीकेश नामक युवकासोबत मैत्री झाली होती. बुलढाणा शहरातील एका कॉलेज जवळ असलेल्या ऋषीकेशच्या घरी संबंधित शिक्षक आला असता त्याचे व ऋषीकेशचे नको त्या अवस्थेतील चित्रफित काढण्यात आली. व त्यानंतर विवेक सखाराम ढोकणे यास मारहाण करून एका शेतात नेत त्याला पैशाची मागणी करण्यात आली. समाजमाध्यमावर ही चित्रफीत व्हायरल न करण्यासाठी त्यास चार लाख रुपये मागण्यात आले. पैसे नसल्याचे विवेक ढोकणेने सांगताच त्यांना मारहाण करण्यात आली.

दरम्यान यावेळी आरोपीसोबत असलेल्या एका युवतीने मध्यस्थी करत पैसे नसतील तर थोडेफार पैसे देण्याचे सांगितले. त्यानंतर शहरातील एका एटीएममध्ये नेऊन १० हजार रुपये काढून घेण्यात आले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी ऋषीकेश (२०), संतोष जाधव (४०), रुपेश (३०) आणि एका युवती विरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणी पोलिसांनी ऋषीकेश आमि संतोष जाधव या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोघांना सायंकाळी बुलढाणा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा