शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:19 IST

बँकेकडून कर्जखात्यातील रक्कम काढून देण्यास नकार दिल्याने पैशासाठी कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पिक विम्याची रक्कम शेतकºयाच्या थेट कर्ज खात्यात जमा होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. बँकेकडून कर्जखात्यातील रक्कम काढून देण्यास नकार दिल्याने पैशासाठी कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकाराची दखल घेवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे. यावेळी थेट कंपनीकडून शेतकºयांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम टाकण्यात आली आहे, याप्रकारात बँकेचा दोष नसल्याचे बँक अधिकाºयाचे म्हणणे आहे.शेगाव तालुक्यातील जलंब येथील शेतकरी अब्दुल्लाह शाह यांचे गट नं. १०८२ मध्ये पिक विम्यापोटी ७ हजार रूपयाची रक्कम बँकेत जमा झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटूंबातील खातुनबी अब्दुल्लाह शाह यांचे गट नं. १०८३ मध्ये पिक विम्यापोटी २१ हजार रूपये, जैतुनबी इनायतउल्ला शाह यांच्या गट नं. ९७ मध्ये २४ हजार रूपये तर शहनाज बानो इनायतउल्लाह शाह गट नं. ८७ मध्ये १८ हजार रूपये पिक विम्याची रक्कम जलंब येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत जमा झाली आहे. परंतु सदर शेतकरी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता बँकेने विड्रॉल करण्यास नकार दिला.

जिल्ह्यातील शेतकरी सध्या आर्थीक संकटात आहे. अशात शेतकºयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. पिक विम्याच्या रकमेवर शेतकºयाचाच हक्क आहे. यामुळे शेतकºयाच्या बचतखात्यात ही रक्कम वळती करावी. जेणेकरून त्याचा लाभ संबधित शेतकºयाला मिळू शकेल.- दिलीप पाटील,संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव.

पिक विम्याची रक्कम बँकेत जमा झाल्याचा मोबाईलवर मॅसेज आला. बँकेत रक्कम काढण्यास गेल्यावर बँकेने रक्कम विड्रॉल करण्यास नकार दिला. तुमचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले असून ते विड्रॉल करता येत नाही. माझ्या मुलाचे ८ मार्च रोजी लग्न आहे. आता मला आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.- अब्दुल्लाह शाह तमिज शाहशेतकरी, जलंब ता. शेगांवयावेळी संबधित विमा कंपनीमार्फत शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. आमच्या बँकेचा यात काही दोष नाही.- स्वप्नील पार्थीकर, व्यवस्थापक,सेंट्रल बँक शाखा जलंब

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा