शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या आमले बंधूचा मन नदीत बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 19:43 IST

नदी घाट हा बाळापूर पो स्टे हद्दीत येत असल्याने पुढील तपास उरळ ता. बाळापूर पोलीस करीत आहेत.  नागझरी येथील भोई समाज बांधवांनी मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले.

शेगाव  : गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या बाळापूर नाका अकोला येथील  आमले बंधूंचा नागझरीच्या मन नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना मंगळवारी दुपारी घडली. गणरायाचे विसर्जन करण्यासाठी बाळापूर नाका अकोला येथील कल्पेश संजय आमले वय 26 व रूपेश संजय आमले वय 25 हे दोघे घरच्या गणपतीचे विसर्जनासाठी  मन नदी वर आले. अचानक दोघेही बुडाल्याने एकच खळबळ उडाली. नदी वर असलेल्या अन्य गणेश भक्तांच्या लक्षात येताच धावाधाव झाली.प्रथम रूपेश ला नदी पात्रातून गणेश भक्तांनी  पाण्याबाहेर काढले.श्वासोश्वास चालू व्हावा पंपिंग करून पाहिले.मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर रूपेशची प्राणज्योत मालवली.त्यानंतर कल्पेशची शोधाशोध सुरू केली.सायंकाळी 6 वाजेदरम्यान कल्पेशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. घटनास्थळी उरळ ता.बाळापूर  तसेच  शेगाव शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी नितिन इंगोले  व स्टाफ हजर होते. पंचनामा करून शवविच्छेदन साठी मृतदेह पाठविण्यात आले. सदर नदी घाट हा बाळापूर पो स्टे हद्दीत येत असल्याने पुढील तपास उरळ ता. बाळापूर पोलीस करीत आहेत. नागझरी येथील भोई समाज बांधवांनी मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले.