शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

  वडिलांपाठोपाठ तरुण मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 17:57 IST

Father and young boy died due to corona : एकाच घरातील दोघांचा अठ्ठेचाळीस तासांत मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनिमगाव : येथील ७५ वर्षीय वृद्धाचा १ मे रोजी मृत्यू झाला.  अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी उलटला नाही तर त्यांच्या तरुण विधिज्ञ मुलाचा २ मे रोजी संध्याकाळी कोरोनाने मृत्यू झाला. एकाच घरातील दोघांचा अठ्ठेचाळीस तासांत मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.कोरोनाची दुसरी लाट शहरासोबत ग्रामीण भागातही कहर करत असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निमगाव येथील ७५ वर्षीय नागरिक व त्यांचा ३६ वर्षीय तरुण विधिज्ञ मुलगा या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, वडील खामगाव येथील खासगी कोविड सेंटरवर तर मुलगा शेगाव येथील खासगी कोविड सेंटरवर उपचार घेत होता. १ मे रोजी सायंकाळी वडिलांची प्रकृती खालावली व त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांचा अंत्यसंस्कार करून घरी परतलेल्या कुटुंबीयांना मुलाचीही प्रकृती खालावल्याचे समजले. त्याचा कोरोनाने ३ मे रोजी सकाळी अठ्ठेचाळीस तासांच्या आत मृत्यू झाला. ३ मे रोजी सकाळी निमगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांपाठोपाठ तरुण विधिज्ञ मुलाचा कोरोनाने बळी घेतल्याने येथील नागरिक भयभीत व चिंताग्रस्त झाले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या