शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जिल्ह्याला १५०० कोटींचे उदिष्ट, ७ टक्के पीककर्ज वाटप; खरीप हंगामाची तयारी सुरू

By विवेक चांदुरकर | Updated: April 30, 2024 17:40 IST

आतापर्यंत ७ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले.

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : खरीप हंगामामध्ये पेरणी करण्याकरिता बॅंकांच्यावतीने शेतकर्यांना पीककर्ज देण्यात येते. यावर्षी जिल्ह्याकरिता १५०० कोटींचे उदिष्ट असून, आतापर्यंत ७ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले.

शेतकर्यांना बॅंकांच्या वतीने एका वर्षाकरिता बिनव्याजी पीककर्ज देण्यात येते. दरवर्षी शेतकरी जुने कर्ज भरून नवीन कर्ज घेतात. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान आटोपले असून शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. शेतातील मशागत सुरू आहे. तसेच पीककर्ज घेण्याकरिता बॅकांमध्ये गर्दी करीत आहे.

जिल्ह्यात १ लाख ५३ हजार ५०० खातेदार शेतकरी आहेत. या शेतकर्यांना कर्जवाटप करण्याकरिता १५०० कोटी रूपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ९ हजार ४९८ शेतकर्यांना १०२ कोटी ३२ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी लोकसभा निवडणूक असल्यामुळे पीककर्ज वाटपाचे प्रमाण घटले आहे. शेतकरी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असल्यामुळे पीककर्ज घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत १० ते १२ टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात येते. जिल्ह्यात सर्वात जास्त उदिष्ट स्टेट बॅंेकला देण्यात आले आहे. स्टेट बॅंकेत ५२ हजार शेतकरी खातेदार असून ४९० कोटी रूपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. या बॅंकेच्या वतीने २३ एप्रिलपर्यंत २३७९ शेतकर्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे.जिल्ह्याला यावर्षी १५०० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले आहे. २३ एप्रिलपर्यंत ७ टक्के शेतकर्यांना पीककर्जवाटप करण्यात आले आहे.- नरेश हेडाऊ, व्यवस`थापक, लिड बॅंक, बुलढाणा

गतवर्षी १२५९ कोटींचे पीककर्ज वाटप

जिल्ह्यात गतवर्षी १ लाख २१ हजार ५०७ शेतकर्यांना १२५९ कोटी १९ लाख रूपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते.बॅकेचे नाव                  शेतकरी संख्या (टक्के)   पीककर्ज वाटप (टक्के)अलाहाबाद बॅंक ० ०बॅंक आॅफ बरोडा २ ४बॅंक आॅफ इंडिया ५ ५बॅंक आॅफ महाराष्ट्र ४ ४कॅनरा बॅंक ३ ४सेंट्रल बॅंक आॅफ इंडिया ५ ५पंजाब नॅशनल बॅंक ६ ७स्टेट बॅंक आॅफ इंडिया ५ ५यूनीयन बॅंक आॅफ इंडिया ४ ७अॅक्सीस बॅंक ० ०एचडीएफसी बॅक १४ ७आयडीबीआय बॅंक २ २आयसीसीआय बॅंक २ १बुलढाणा जिल्हा केंद्रिय सहकारी बॅंक १६ ३१

टॅग्स :KharifखरीपAgriculture Sectorशेती क्षेत्र