लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा बॉक्सिंग असोशिएशनच्यावतीने ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत बुलडाणा येथे पार पडलेल्या ९० राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिक्य स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी अकोला हा संघ विजयी ठरली आहे. मुंबई उपनगर बॉक्सिंग संघ हा उपविजेता ठरला आहे. पुणे बॉक्सिंग असोसिएशन या संघाला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. अंतिम लढतीच्या विविध वजन गटातील महाराष्ट्रातील १३ मुष्टियोध्दे बेल्लारी (कर्नाटक) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये मुंबई विभागाचे ५, पुणे जिल्ह्याचे ४, कोल्हापूर ३, जालना १ या मुष्टियोध्दांचा समावेश आहे. विविध वजन गटात या स्पर्धेची ७ सप्टेंबर रोजी अंतिम लढत झाली. सुपर हेवीवेट (९२ किलो) गटात पुण्याच्या रेनॉल्ड जोसेफ याने मुंबई उपनगराच्या अनिल सिंग यांचा पराभव करुन “उत्कृष्ट बॉक्सर किताब” पटकाविला. या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य, व कांस्य पदक देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोशिएशनचे महासचिव डॉ.राकेश तिवारी यांनी संपूर्ण स्पर्धेच्या कालावधीत स्पर्धा यशस्वी करण्याचे योग्य नियोजन केले. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतकुमार वावळ यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा बॉक्सिंग असो.चे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, उपाध्यक्ष नीलेश इंगळे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष आंबेकर, सचिव राज सोळंकी, मदनराजे गायकवाड, मोहम्मद सुफीयान व त्यांच्या चमूने सहकार्य करून स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 12:06 IST