शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-खंडवा ब्रॉडगेज पर्यायी रेल्वे मार्गासाठी रेटा;  आ. सपकाळांचे विदर्भातील लोकप्रतिनिधींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:03 IST

बुलडाणा : मेळघाटमधून जाणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे संवर्धित पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार असून, शाश्वत विकासाची संकल्पना लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचाच अवलंब करण्याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व आमदार व खासदारांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व लोकसभा सदस्यांना २९ जून रोजी पत्र लिहिले आहे.प्रस्तावित मेळघाट मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे.सर्वांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री व शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पर्यायी मार्गाचा अवलंब प्रकल्पासाठी व्हावा, अशी विनंती केली आहे.

बुलडाणा : मेळघाटमधून जाणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे संवर्धित पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार असून, शाश्वत विकासाची संकल्पना लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचाच अवलंब करण्याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व आमदार व खासदारांना पत्राद्वारे केली आहे.काँग्रेसप्रणीत सरकारच्या काळात २००८ मध्ये मंजूर झालेल्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी मेळघाटऐवजी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने २०१५ मध्ये सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा विचार व्हावा, याबाबत पर्यावरणवादी व इतरांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, १८ जून रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या मागणीला केराची टोपली दाखवित प्रस्तावित मार्गानेच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय केंद्राच्या मंत्री गटाच्या समितीने घेतला आहे. यापूर्वीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळेच या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते यांनी आॅनलाइन याचिका दाखल केली असून, नागपूर खंडपिठातसुद्धा जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यानुषंगाने आ. सपकाळ यांनी यापूर्वीच राज्यपालांना पत्र लिहून निर्णयाबाबत पुनर्विचार व केंद्र सरकारकडे पर्यायी मार्गाची शिफारस करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व लोकसभा सदस्यांना २९ जून रोजी पत्र लिहिले आहे. त्यात मेळघाटमधून जाणाºया प्रस्तावित मार्गाऐवजी पर्यायी मार्ग व्यापक लोकहिताचा असल्याबाबत नमूद करून प्रस्तावित मेळघाट मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच ही जनभावना लक्षात घेता आपण सर्वांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री व शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पर्यायी मार्गाचा अवलंब प्रकल्पासाठी व्हावा, अशी विनंती केली आहे.

दिल्लीतील बैठकीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी शुभेच्छा : सपकाळमानव विकास निर्देशांकात माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद या तालुक्यांच्या सर्वंकष विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण म्हणून ठरू शकणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वेच्या पर्यायी मार्गासाठी जिल्ह्याचा नागरिक म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये श्रेयवादाचा कुठेच प्रश्न येत नाही. संबंधित परिसराचे लोकप्रतिनिधी हे या महिन्यात दिल्लीत होणाºया बैठकीत हा प्रश्न मार्गी लावणार असतील, तर निश्चित आनंद आहे. त्यासाठी आपल्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत. दिल्लीतील बैठकीसाठी जर दोन्ही तालुक्यातील काही नागरिक उपस्थित राहू शकले, तर पारदर्शकतेच्या दृष्टीने ते अधिक उचित होईल, अशी पुस्तीही आ. सपकाळ यांनी या विषयासंदर्भात बोलताना जोडली. सत्ताधाºयांकडून मागणी पूर्ण न झाल्यास जनहितासाठी काँग्रेस पक्ष न्यायालयापासून रस्त्यावरील संघर्षापर्यंत तयार राहील, असे ही ते म्हणाले.

 

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ