शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात साकारणार वातानुकूलीत नाट्यगृह! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:19 IST

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १२00 प्रेक्षक क्षमतेचे प्रशस्त अशा वातानुकूलीत नाट्यगृहास मंजुरात मिळाली आहे. कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर   यांच्या मार्गदर्शनात आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाने या कामासाठी  ५ कोटी रुपयांचा निधीसुद्धा प्रदान  केला आहे. 

ठळक मुद्देवैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटींचा निधी १२00 प्रेक्षकांची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १२00 प्रेक्षक क्षमतेचे प्रशस्त अशा वातानुकूलीत नाट्यगृहास मंजुरात मिळाली आहे. कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर  यांच्या मार्गदर्शनात आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाने या कामासाठी  ५ कोटी रुपयांचा निधीसुद्धा प्रदान  केला आहे. खामगाव ही विनोदी लेखक व नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची पावन भूमी असून, खामगाव येथे मोठमोठे दिग्गज नाटककार व साहित्यिक येऊन गेले आहेत; परंतु खामगावात भव्यदिव्य असे नाट्यगृह नाही. खामगावात अनेक नाट्य रसिक असल्याने एखादे भव्यदिव्य नाट्यगृह व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या अनुषंगाने ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ. अँड.आकाश फुंडकर यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकाराने नगरपालिकेला १२00 प्रेक्षकक्षमता असलेले संपूर्ण वातानुकूलीत असे प्रशस्त नाट्यगृह बांधकामास मंजुरात मिळाली आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. खामगाव शहरातील जे.व्ही.मेहता हायस्कूलच्या पाठीमागे हे भव्यदिव्य असे नाट्यगृह साकारण्यात येणार आहे. राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण  योजनेंतर्गत जे विशेष अनुदान देण्यात येते, त्या अनुदानातून या नाट्यगृहाला मंजुरात देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्र.न.पा.वै.२0१७/प्र.क्र.१७२ (२४) नवि-१६ मंत्रालय मुंबई दि. २0 नोव्हेंबर २0१७ नुसार या नाट्यगृहाला मंजुरात मिळाली आहे. यासंदर्भात मंजुरातीचे व ५ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येत असल्याचे पत्रही खामगाव नगर परिषदेला प्राप्त झाले आहे. खामगाव शहरात एक भले मोठे तसेच सुसज्ज असे नाट्यगृह असावे, ही नाट्यरसिकांची इच्छा यामुळे फलद्रूप होणार आहे.  

मागच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्याकडे खामगावात भव्यदिव्य नाट्यगृह व्हावे, अशी मागणी केली होती. हिवाळी अधिवेशनापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ही मागणी पूर्ण केली. यामुळे नाट्यरसिकांसह सर्वच कलाप्रेमींची मोठी सोय होणार आहे. - आ. अँड. आकाश फुंडकर-

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर