लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील विविध गावात असणारी पाणीटंचाई, निसर्गाचे बिघडलेले चक्र यास मानवाकडून मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड कारणीभूत आहे. यासाठी राज्य शासनाने सन २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, यावर्षी जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३ लाख १५ हजाराचे उद्दिष्ट दिले आहे.राज्यात २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, या वर्षी कोटीचे उद्दिष्ट राज्याचे आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला यंदा ८.५२ लक्ष वृक्ष लागवड करावी लागणार आहे. या मध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्हयातील ८५९ ग्राम पंचायतींना ३.१५ लाख इतके देण्यात आले आहे. तर वनीकरण सामाजिक वनीकरणचा यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग राहणार आहे.जिल्ह्यात होणाऱ्या वृक्षलागवडीमध्ये वन विभाग दोन लाख २८ हजार, सामाजिक वनीकरण एक लाख २८ हजार, कृषी विभाग ६८,५१२, नगर विकास विभाग १७ हजार, सार्वजनिक बांधकाम विभाग २ हजार, सहकार तथा वस्रोद्योग विभाग १० हजार, प्राथमिक शिक्षण विभाग ३२,८३०, माध्यमिक शिक्षण विभाग १० हजार ५९, गृह विभाग ५ हजार ५००, आदिवासी शाळा ६ हजार ७५०, सामाजिक न्याय विभाग १ हजार ४४५, जिल्हा आरोग्य अधिकारी बावन प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फंत १ हजार ४०४, जिल्हा शल्य चिकीत्सक १६ संस्थाद्वारा १ हजार ३००, महावितरण २ हजार ७००, अन्न औषधी प्रशासन १०३ दवाखांन्याद्वारा १६५, राज्य उत्पादन शुल्क विभाग ८००, कारागृह विभाग २००, राज्य परिवहन विभाग ७००, उप प्रादेशिक परिवहन विभाग ५०, विधी न्याय विभाग १५९, जि.प. सिंचन विभाग १ हजार ६००, पाटबंधारे ११,७००, कौशल्य विकास विभाग १३ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामार्फंत २ हजार, महसुल विभाग २ हजार ९००, बाल कल्याण विभाग दोन हजार ८६०, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग १२२ दवाखान्यामार्फत २ हजार ४२०, जिल्हा आयुक्त पशुसंवर्धन ५ दवाखान्यांमार्फत २६०, जिल्हा कोषागार कार्यालय ५०, बीएसएनएल ५०, जिल्हा डाक कार्यालय २००, क्रीडा विभाग १०० ग्राम विकास विभाग ३ लाख १५ हजार वृक्षाचे रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.मागिलवर्षीचे ८२.६१ टक्के वृक्ष जिवंतमागीलवर्षी तीन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बुलडाणा जिल्ह्याला ३ लाख ५३ हजार ६३३ इतके उद्दिष्ट होते. जिल्ह्यात त्यानुसार झालेल्या वृक्षारोपणातील २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जगले आहेत.ज्याचे प्रमाण ८२.६१ टक्के आहे. सामाजिक वनीकरण लावलेल्या वृक्षांपैकी ९४.५६ टक्के वृक्ष जगले,वनविभागाचे ७५.१५ टक्के तर परिवहन विभाग क्रीडा विभागाचे ५६ टक्के पशुसंवर्धनने केलेले ५० टक्के वृक्ष जगले आहे.पर्यावरण टिकविण्याचे दृष्टीने वृक्ष लागवडीसाठी सर्वांनी सहकार्याची भुमिका ठेवावी व समाजात जनजागृती करून वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घ्यावा.- डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी, बुलडाणा.