शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : बियाणेकोंडीवर गुणनियंत्रकांचा वॉच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 11:11 IST

Agriculture News: बुलडाणा जिल्ह्यात ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि १४ भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद : गतवर्षी शेतकऱ्यांची बियाणेकोंडी झाली होती. अर्थात पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी दोन वर्षांत समोर आल्या. त्यामुळे आता ही बियाणे कोंडी थांबण्यासाठी कृषी विभागाने कृषी निविष्ठांची गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि १४ भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनातही बुलढाणा जिल्ह्याच्या सुमारे साडेसात लाख हेक्टरपैकी पावणेचार लाख हेक्‍टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.दोन वर्षांपूर्वी अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले, तर गतवर्षी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले होते. सदोष बियाणांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांकडून तक्रारी आल्या. बियाणेच न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र यातही बऱ्याच ठिकाणी वेळ निघून गेल्याने उत्पादनात घट झाली कृषी विभागाने यंदा शेतकऱ्यांची ही बियाणे कोंडी थांबण्यासाठी कृषी निविष्ठांची गुणनियंत्रकामार्फत तपासणी करण्याची मोहीम आखली आहे.   

३८ गुणनियंत्रकांवर जबाबदारी  जिल्ह्यात बियाणांचे १,३८६,  रासायनिक खतांचे १,३९६ व कीटकनाशकांचे १.३४० परवानाधारक वितरक आहेत.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग मिळून  ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नेमण्यात आले आहेत. यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रक, मोहीम अधिकारी,  कृषी  विकास अधिकारी,  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.   येत्या हंगामासाठी कृषी केंद्रांवरील बियाणांचे १,०६०, रासायनिक खतांचे ६२३ व कीटकनाशकांचे २१५ नमुने काढण्याचे लक्ष्यांक निर्धारित करण्यात आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीJalgaon Jamodजळगाव जामोद