सिंदखेडराजा: आपल्या कडील शेती आणि शेतकरी समृध्द झाला पाहिजे त्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्नांची गरज आहे असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केले.
किसान ब्रिगेडच्या सायकल रॅलीस मातृतीर्थावरून ३ मार्च राेजी सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी वरून प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते.
ही सायकल रॅली विदर्भात भिरून शेतकऱ्यांची जागृती करणार आहे.या सायकल रॅलीत १० सायकल स्वार सहभागी झाले असून यात ११ वर्षाचा एक छोटा मुलगाही सहभागी झाला आहे.
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा,अन्यायकारक व जाचक कायदे रद्द व्हावेत म्हणून या अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याचे खेडेकर यांनी म्हंटले आहे.जगात जेव्हा १०० रुपये तयार होतात तेव्हा १०० पैकी ९६ रुपये भारतात तयार व्हायचे. आता १०० रुपये तयार होताना आपल्या देशात ४ पैसे तयार होतात. ही परिस्थिती बदलणे गरजेचे असून त्यासाठी शेतकरी समृद्ध होणे गरजेचे आहे,असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काजी,शिवाजी राजे जाधव, संदीप मेहेत्रे,ज्याती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.