शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळी व्यवस्थापनावर कृषी शास्त्रज्ञांचे विचार मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:16 IST

ळाव्यात मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थानावर विचार मंथन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापन जागृती अभियान अंतर्गत सोमवारी बुलडाण्यात शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थानावर विचार मंथन झाले.या कार्यक्रमास दक्षिण एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, दक्षिण एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नवी दिल्लीचे संचालक डॉ. भागीरथ चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील संशोधन संचालक, डॉ. विलास खर्चे, डॉ. दिलीप मानकर, डॉ. धनराज उंदिरवाडे, संतोष डाबरे, डॉ. चंद्रकांत जायभाये, डॉ. दिनेश कानवडे, डॉ. सतीश जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पंदेकृवी अकोलाचे संशोधन संचालक अकोला डॉ. विलास खर्चे यांनी आपल्या प्रस्तावनापर मार्गदर्शनामध्ये या कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करीत मका पिकावरील नवीन लष्करी अळी नियोजनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापिठ कीटकशास्त्रज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हि कीड नियंत्रणात ठेवण्यात शेतकऱ्यांना यश मिळते आहे, याबाबत समाधान व्यक्त केले. दक्षिण एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे नमूद केले. यावेळी संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी मका पिकाचे औद्यागिक, मनुष्य आहार, पशु खाद्य, कोंबडी खाद्य, सौंदर्य प्रसाधन या दृष्टीने महत्त्व विषद केले. हे एक आंतरराष्ट्रीय पिक आहे आणि त्याचे लष्करी अळीपासून संरक्षणासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा वापर करावा, असे आवाहन केले. डॉ. सी. डी. मायी यांनी आपल्या लष्करी अळीचा शिरकाव आणि तिच्या नियंत्रणासाठी सर्जिकल स्ट्राईक करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. कामगंध सापळ्यावर भर देणे आवश्यकडॉ. भागीरथ चौधरी यांनी मक्यावरील लष्करी अळीचा जीवनक्रम नियंत्रणासाठी बीज प्रक्रियापासून वापरण्यात येणारे वेगवेगळ्या शिफारसीत कीटकनाशके त्याची कार्यपद्धती, कीटकनाशकाच्या फवारणीच्या वेळा व पद्धती, सुरक्षित कीटकनाशक हाताळणी व वापर, एकत्मिक कीड व्यवस्थापनेचे महत्त्व सांगितले. कामगंध सापळे तसेच रासायनिक कीटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी संरक्षक गॉगल्स, मास्क, हातमोजे या बद्दल माहिती दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ