लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :- संपूर्ण राज्यात दुधाला प्रति लिटर पाच रुपये वाढीव दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे. त्याच पार्श्वभूमी वर आज बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते श्याम अवथळे यांच्या नेतृत्वात कडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुळल्याला गळफास देऊन चपला जोडे मारून सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला.खामगाव तालुक्यातील मांडका येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता च्या सुमारास फडणवीस सरकार च्या प्रेताला सरणावर ठेऊन दूध पाजून प्रेत जाळण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. सरकार ने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या दोन दिवसात पूर्ण न झाल्यास यानंतर मंत्र्यांच्या गाड्या जाळणार असल्याचे यावेळी शाम अवथळे यांनी सांगितले. यावेळेस गिरीधर देशमुख,शेख युनूस भाई ,अनिल मिरगे, सोपान खंडारे, रामकृष्ण जुमले,संजय बोचरे, विठ्ठल महाले, रोशन देशमुख यांचेसह इतर पदाधधिकारी व कार्यकर्त्या सह शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गळफास देऊन दिला चिताग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:08 IST
खामगाव :- संपूर्ण राज्यात दुधाला प्रति लिटर पाच रुपये वाढीव दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गळफास देऊन दिला चिताग्नी
ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुळल्याला गळफास देऊन चपला जोडे मारून सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. सकाळी अकरा वाजता च्या सुमारास फडणवीस सरकार च्या प्रेताला सरणावर ठेऊन दूध पाजून प्रेत जाळण्यात आले. मागण्या दोन दिवसात पूर्ण न झाल्यास यानंतर मंत्र्यांच्या गाड्या जाळणार असल्याचे यावेळी शाम अवथळे यांनी सांगितले.