शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव- नगरसेवकांनी काढली सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 16:43 IST

नगर पालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधुन रस्त्याची कामे करण्यात आली.

शेगाव : नगर पालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधुन रस्त्याची कामे करण्यात आली. तर या रस्त्यालगत शहरभर हजारो झाडांची लागवड न.प.च्या वतीने करण्यात आली. मात्र ही झाडे पाण्याअभावी सुकत असल्याने याबाबत प्रशासनाची झोप उघडविण्यासाठी गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा नगर पालिकेवर पोहचवुन आंदोलन केले.शेगाव विकास आराखड्याअंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी शहरातील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र शहर विकास करीत असतांना या झाडांच्या मोबादल्यात हजारो झाडे शहराच्या हद्दीत लावण्यात आली. अनेक भागांमध्ये नगर पालिका व शहरातील दानशुर संस्थांच्या वतीने ट्री- गार्ड ही लावण्यात आले. मात्र भर उन्हाळयामध्ये या झाडांना पाणी नसल्याने शहरातील शेकडो झाडे पुर्णपणे सुकली आहेत. तर हजाराच्या वर झाडे सुकण्याच्या मार्गावर आहे. या झाडांना नगर पालिकेने टँकर व्दारे पाणी पुरवठा करावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. यावर मुख्याधिकायांनी टँकरव्दारे लगेच पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र आश्वासनाची पुर्ती झाली नसल्याने आणि झाडे मृत पावण्याच्या संख्येत वाढ होत चालल्याने आज गुरुवारी शिवसेनेच्या नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष दिनेश शिंदे, शैलैष डाबेराव, योगेश पल्हाडे, काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेष पटोकार  यांच्यासह राजाभाऊ शेगोकार, गोपाल पांडे, आशिष गणगणे आदींनी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान शिवाजी चौक येथुन सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा काढुन न.प.मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या थेट कॅबिन समोर धडकवली. यावेळी पोलीसांनी अडविल्याने ही तिरडी यात्रा कॅबिनच्या आत पोहचविता आली नाही. दरम्यान आंदोलकांनी न.प.च्या इमारतीमध्ये तिरडी ठेवून ठाण मांडले. यावेळी बयाच वाटाघाटीनंतर मुख्याधिकारी पंत यांनी आंदोलकांकडुन निवेदन स्विकारले. यावेळी येत्या दोन दिवसात झाडांना पाण्याचे टँकर सुरु झाले नाही तर यापेक्षाही तिव्र आंदोलन छेडु व याला  फक्त न.प. प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आंदोलक नगरसेवकांनी दिला.

काय म्हणाले मुख्याधिकारी संबधित वृक्ष हे महामार्ग वरील असून ते आम्हाला अद्याप हँडओव्हर झालेले नाही. तरीही आम्ही आमचा अख्त्यारितिल झाडांना पाणी देत असतांना त्यांनाही पाणी देत असतो. तसेही नगरसेवकांनी तशी मागणी केली असती तर मी ती पण मान्य केली असती पण अशाप्रकारे शिविगाळ करून दहशत निर्माण करणे अत्यंत चुकीचे आहे असे मुख्याधिकारी अतुल पंत म्हणाले.