शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:21 IST

नगर पालिका आणि नगर पंचायतीतील कामगारांनी आजपासून काळीफित आंदोलन सुरू केले

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  राज्यातील ३५७ पालिका व नगर पंचायतील कर्मचारी तसेच सफाई कामगारांचा जीवन विमा काढण्यास राज्य शासनाची नकार घंटा कायम आहे. परिणामी राज्यातील सर्वच नगर पालिका आणि नगर पंचायतीतील कामगारांनी आजपासून काळीफित आंदोलन सुरू केले आहे. कोरोना संचारबंदी काळात या आंदोलनाला कर्मचाºयांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे. कोरोना या विषाणू संसर्गाचा सामना करणाºया आरोग्य, ग्रामविकास आणि पोलिस कर्मचाºयांचा राज्य शासनाने गत महिन्यापूर्वीच विमा उतरविला आहे. मात्र, राज्यातील ३५७ नगर पालिका, नगर पंचायतीतील कर्मचारी आणि सफाई कामगारांना यामधून वगळण्यात आले आहे. कोरोना फायटर्स म्हणून सफाई कामगारांची भूमिका महत्वाची आहे. मात्र, त्यांचा तसेच पालिका कर्मचाºयांचा जीवन विमा काढण्यास राज्य शासनाची उदासिन भूमिका आहे. परिणामी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटनेच्यावतीने सोमवार २७ एप्रिलपासून काळीफित आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र सफाई कामगार संघटना आणि अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचा पाठींबा आहे. त्याचवेळी महानगर पालिकांमधील कर्मचारी संघटनांनी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.२५ हजारापेक्षा जास्त सफाई कामगारांचा समावेश!्नराज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील सुमारे २५ हजार सफाई कामगार या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. राज्यातील ठिकठिकाणी हे आंदोलन होत आहे. त्यामुळे कोरोना संचारबंदी काळात राज्य शासनाची डोकेदुखी वाढणार असल्याचे संकेत आहेत. काही पालिका संघटनांनी राज्य शासनाविरोधात निदर्शनेही केली आहेत.

नगर पालिका आणि नगर पंचायती मधील कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात काळीफित आंदोलन केले आहे. तत्पूर्वी शासनाकडे निवेदनाद्वारे न्यायाची अपेक्षा केली होती. मात्र, शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.- विश्वनाथ घुगेराज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटना, महाराष्ट्र

नगर पालिका आणि नगर पंचायतील कर्मचारी तसेच सफाई कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी संपात सहभागी झालो आहोत. राज्यातील सर्वच पालिका आणि नगर पंचायत कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामध्ये खामगाव पालिकेतील कर्मचाºयांचाही समावेश आहे.- मोहन अहीरसदस्य, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटना, महाराष्ट्र

टॅग्स :khamgaonखामगाव