शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अतिक्रमण!

By admin | Updated: March 26, 2016 02:20 IST

बुलडाणा जिल्हा प्रशासनाची कारवाई सुरू; फौजदारी गुन्हे दाखल करणार.

बुलडाणा : शहरातील हटविण्यात आलेले अतिक्रमण आज अचानक पुन्हा अतिक्रमकांनी काही ठिकाणी दुकाने उभी करून पुन्हा अतिक्रमण थाटण्यास सुरुवात केल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाला सलग चार दिवस सुट्या आल्यामुळे हा प्रकार कुणीतरी करावयास लावला असावा? मात्र, याचा बोलवता धनी कोण? याचा शोध प्रशासन घेत आहे. दरम्यान, सुटीचा दिवस असतानाही नगरपालिकेने अतिक्रमण करणार्‍यांना समज देऊन अतिक्रमण करणार्‍यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा आदेश दिला. अतिक्रमणाचा विळखा बसलेले बुलडाणा शहर कायमचे टपरीमुक्त करण्याचा निर्धार करीत नगरपालिकेने ३ डिसेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. जवळपास १५ दिवस ही मोहीम चालली. शहरातील मुख्य रस्त्यापासून तर वार्डा-वार्डातील गल्लीबोळात असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. सुमारे १४00 टपरी दुकाने हटविण्यात आली होती. अतिक्रमण उठविल्यामुळे ज्या व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधन कायमचे गेले, अशा गरजू छोट्या व्यावसायिकांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेत शहरातील रिकाम्या असलेल्या शासकीय जागेवर ह्यबांधा, वापरा, हस्तांतरित कराह्ण या तत्त्वावर गाळे बांधून देण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे. सध्या त्यावर कारवाईही सुरू आहे. मात्र धूलिवंदनाच्या दिवशी सुटीचा दिवस पाहून शहरातील काही अतिक्रमकांनी पुन्हा त्याच जागेवर दुकाने लावण्यास सुरुवात केली. दुसरे दिवशीसुद्धा शहरातील अनेक भागात लघुव्यावसायिकांनी टपरी दुकाने थाटल्याचे दिसत होते. अचानकपणे अतिक्रमण करण्यास कोणी आदेश दिला, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. शुक्रवार, २५ मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयाच्या पाठीमागील भागात लोकांनी दुकाने थाटली. तर जिल्हा परिषद शाळेची भिंत तोडून शाळेच्या हद्दीत काही व्यावसायिकांनी दुकाने लावली. जि.प. अध्यक्षांच्या निवासस्थानासमोर, कोर्टाच्या बाजूला, जयस्तंभ चौक पुन्हा जागा अडवून ठेवल्याचे दिसत होते. शहरात अचानक सुरू झालेले हे अतिक्रमण पाहून हा काय प्रकार सुरू आहे? असा सवाल उपस्थित होत होता.