शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात तुरीनंतर हरभरा खरेदीचाही वांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:38 IST

बुलडाणा : तुरीनंतर हरभ-याचीही हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी जिल्ह्यात नाफेड केंद्र उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीपाठोपाठ आता हरभरा खरेदीचाही वांधा निर्माण झाल्यामुळे शेतकºयांना आपला हरभरा व्यापाºयांना मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.

ठळक मुद्देनाफेड केंद्रावर हरभरा खरेदी बंदच मिळेल त्या भावात हरभरा विक्री!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तुरीनंतर हरभ-याचीही हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी बुलडाणा जिल्ह्यात नाफेड केंद्र उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीपाठोपाठ आता हरभरा खरेदीचाही वांधा निर्माण झाल्यामुळे शेतक-यांना आपला हरभरा व्यापा-यांना मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाने हमीभाव जाहीर केला आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाने शेतमालाची खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत जिल्ह्यात हरभ-याची खरेदी करण्यास अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. जागेअभावी अनेक ठिकाणी नाफेडकडून हरभºयाची खरेदी सुरू न झाल्याने हरभरा उत्पादक शेतकºयांना खासगी व्यापाºयांना मिळेल त्या दराने आपला माल विकावा लागत आहे. नाफेड केंद्रांतर्गत अनेक वेळा जिल्ह्यात तूर खरेदी बंद झाली. त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. यामुळे सुरुवातीपासून हमीभावाने तूर खरेदी करण्याच्या प्रक्रियेला सर्वच केंद्रांवर ग्रहण लागल्याने शेतकरी आपला माल हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. आता तुरीपाठोपाठ हरभरा खरेदीला नाफेड केंद्रावर सुरुवात करण्यात आली आहे. हरभºयासाठी ४ हजार ४०० रुपये हमीभाव ठेवण्यात आला असून, आतापर्यंत हजारो शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभही करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात हरभरा खरेदीला सुरुवात होत नसल्याचे चित्र आहे. महिनाभरापूर्वी हरभºयाची खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु अद्यापपर्यंत शेतकरी हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या लग्न समारंभ सुरू असल्याने अनेक शेतकºयांना पैशाची गरज भासते; परंतु नाफेड केंद्रावर नोंदणी करूनही हरभरा खरेदी होत नसल्याने नाइलाजाने शेतकºयांना आपला माल खासगी व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे. परिणामी शासनाने जाहीर केलेल्या ४ हजार ४००  रुपयांच्या भावापेक्षा एक ते दीड  हजार रुपये कमी दराने बाजारात हरभरा खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

घाटावरील हरभरा खरेदी अनियमितघाटावरील तालुक्यातील नाफेड केंद्रावर हरभरा खरेदीमध्ये अनियमितता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मेहकर येथील नाफेड केंद्रावर हरभरा खरेदी सुरू करण्यात आली, तर सिंदखेडराजा तालुक्यातील नाफेड केंद्रावर २७ एप्रिल रोजी हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला; मात्र अद्यापही बुलडाणा, लोणार, चिखली, मोताळा व देऊळगावराजा येथील नाफेड केंद्रावर हरभरा खरेदी बंद आहे. 

शुभारंभ नावालाच!जिल्ह्यातील काही नाफेड केंद्रांवर हरभरा खरेदीचा केवळ शुभारंभ झाला असून, खरेदी केंद्र प्रत्यक्षात बंद असल्याचे चित्र आहे. बुलडाणा येथील नाफेड केंद्रावर २० एप्रिल रोजी थाटात हरभरा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला; मात्र गेल्या आठ दिवसांपासून येथे हरभरा खरेदी करण्यात आली नाही, त्यामुळे हा शुभारंभ केवळ नवालाच उरल्याचे चित्र दिसून येत आहे.

जागेचा ठरतोय अडसरनाफेड केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या मालाची साठवणूक करण्यासाठी जागेचा अभाव निर्माण होत असल्याने खरेदी केंद्र वारंवार बंद राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तुरीची खरेदीही जागेअभावी बंद करण्यात आली होती; आता पुन्हा हरभरा खरेदीसाठी जागेचा अडसर कळीचा मुद्दा बनत आहे. खरेदी झालेला माल साठविण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा