शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील ५०१ मजूर उत्तरप्रदेश साठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:20 IST

भुसावळ रेल्वे स्टेशनमधून श्रमजिवी एक्सप्रेसने त्यांची पाऊले घराकडे वळाली.

बुलडाणा : लॉकडाउनमध्ये तब्बल दीड महिन्यापासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील निवारा केंद्रात ठेवलेल्या उत्तरप्रदेशमधील ५०१ मजुरांना बुधवारी प्रशासनाने रवाना केले. भुसावळ रेल्वे स्टेशनमधून श्रमजिवी एक्सप्रेसने त्यांची पाऊले घराकडे वळाली. कोरानो विषाणूचा शिरकाव देशात झाल्याचे लक्षात येताच भविष्याचा वेध घेत केंद्र शासनाने देशात २४ मार्चपासून लॉकडाउन सुरू केले. प्रशासनाकडून त्याची कडक अंमलबजावणीही करण्यात आली.  लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे राज्यात असलेले परप्रांतीय मजूर अडकून पडले. राज्य शासनाने स्थलांतरीत व अडकून पडलेल्या मजूरांची  निवास, भोजनाची मोफत व्यवस्था केली.  पायी घराची वाट धरणाºया मजूरांना प्रशासनाने निवारा केंद्रांमध्ये ठेवले. भोजन, निवासासह समुपदेशन, आरोग्य तपासणी व मनोरंजनाची व्यवस्थाही करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील स्थलांतरीत ५०१ मजुरांना प्रशासनाने मोफत त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी बुधवारी भुसावळ  रेल्वे स्टेशनवर पोहोचविले. तेथून विशेष श्रमजीवी रेल्वे लखनऊसाठी सायंकाळी ६ वाजता सुटली. या रेल्वेमध्ये जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांतील मजुरांसह बुलडाणा जिल्ह्यातील ५०१ मजूर लखनऊसाठी रवाना झाले. ही रेल्वे लखनऊ येथे सात मे रोजी सकाळी ८ वाजता पोहोचणार आहे. निवारा केंद्रामध्ये केलेल्या व्यवस्थेबद्दल मजूरांनी प्रशासनाचे धन्यवाद मानले. भुसावळ रेल्वे स्टेशनवर जिल्ह्यातील महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी त्या मजुरांना त्यांच्या गावाकडे रवाना करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते. रेल्वे सुटण्यावेळी अधिकारी व कर्मचाºयांनी मजुरांना टाळ्या वाजवून आनंदाने भावपूर्ण निरोप दिला. घराची ओढ लागलेल्या काही मजुरांच्या द्वयनेत्रात आनंदाश्रूही तरळले तर काहींच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या