शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांनंतर भाविकांनी फुलली संतनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 15:59 IST

Shegaon Gajanan Maharaj Temple मंगळवारी मंदिर खुले होताच शेगावातील वर्दळ अचानक वाढली.

ठळक मुद्देसोमवारी रात्रीच दूरवरचे काही भाविक दर्शनासाठी दाखल झाले.विसावा आणि भक्त संकुलमधील रूम फुल्ल झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील धार्मिक स्थळं मार्च महिन्यांपासून बंद होती. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराज संस्थानचाही समावेश होता. मंगळवारी मंदिर खुले होताच शेगावातील वर्दळ अचानक वाढली. सोमवारी रात्रीच दूरवरचे काही भाविक दर्शनासाठी दाखल झाले. त्यामुळे संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा आणि भक्त संकुलमधील रूम फुल्ल झाल्या होत्या. काही भाविक खासगी लॉजमध्येही  थांबले होते. परिणामी, गत आठ महिन्यांपासून बंद असलेले लाॅजही उघडण्यात आले. एसटी बस आणि खासगी प्रवासी वाहतुकीने शेगावात दाखल झालेल्या हजारो भाविकांनी ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांना मंदिरात येण्यासाठी प्राधान्य दिलेे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनाही अचानक दिलासा मिळाला. हॉटेल आणि लॉज व्यावसायिकांनीही मंदिर उघडल्याचे समाधान व्यक्त केले. बंद असलेला व्यवसाय सुरू होऊन विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी मंदिर उघडण्याचा निर्णय अतिशय योग्य असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.हार फुलविक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही मंगळवारी समाधान दिसून आले. मंदिरात हार फुले आणि प्रसाद आणण्यास मनाई असली तरी शेगावात येणारे भाविक घरी नेण्यासाठी प्रसाद आणि हार खरेदी करीत असल्याचे सत्यभामा तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, सोमवारी रात्री मुक्कामी आलेल्या भाविकांमुळे हॉटेल आणि लॉजींग व्यवसाय तेजीत आला आहे.  काही भाविक स्वत:च्या वाहनाने शेगावात येत असल्याने काहींच्या हाताला पार्किगच्या माध्यमातून काम मिळाल्याचे चित्र मंगळवारी संतनगरीत दिसून आले. अष्टगंध, कुंकु आणि इतर साहित्य विक्री करणाऱ्या महिलांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध साहित्याची दुकाने थाटली होती. या दुकानांवरूनही भाविकांनी खरेदी केल्याचे दिसून आले.

 

आर्थिक घडी हळूहळू पूर्वपदावरविदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांचे मंदिर मंगळवारी खुले करण्यात आले. त्यामुळे गत आठ मंहिन्यांपासून शेगावची विस्कटलेली आर्थिक घडी आता हळूहळू पूर्वपदावर येणार असल्याचे संकेत आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी मोठ्याप्रमाणात भाविक  दाखल झाले. परिणामी, पार्किंग आणि वाहन व्यवस्थेला चालना मिळाल्याचे दिसून आले. चहा, नास्ता, खानावळ आणि हॉटेल व्यवसायालाही लाभ होणार असल्याचे मंगळवारी दिसून आले. 

टॅग्स :ShegaonशेगावGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर