बुलडाणा : सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका बजाविताना आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. राज्य शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट हेक्टरी ५0 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी मागील आठवड्यात काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. प्रत्येक तालुक्यात काँग्रेसच्याव तीने धरणे आंदोलनही केले. आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही उद्या ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करून शेतकर्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उ तरणार आहेत. दुष्काळ जाहीर करा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ५ लाख रुपये आर्थिक मदत द्या, फळबागेच्या नुकसानभरपाईपोटी आर्थिक मदत द्या, जवखेडे दलित हत्याकांडचा त पास सीबीआयकडे द्या, या मागण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीही रस्त्यावर
By admin | Updated: December 8, 2014 01:40 IST