शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जामोद तालुक्यात रासायनिक खते, बियाण्यांचा पुरेसा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 19:29 IST

Jalgaon Jamod News : कपाशी बियाण्यांचे ४५० व ४७५ ग्रॅमचे ८५००० हजार पॅकेट उपलब्ध झाले असून त्याची विक्री १ जून नंतर करण्यात येणार आहे.

-नानासाहेब कांडलक

जळगाव जामोद : तालुक्यात विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा साठा ४४२९ मॅट्रिक टन एवढा असून सोयाबीन बियाण्याची उपलब्धता १९७० क्विंटल एवढी आहे. कपाशी बियाण्यांचे ४५० व ४७५ ग्रॅमचे ८५००० हजार पॅकेट उपलब्ध झाले असून त्याची विक्री १ जून नंतर करण्यात येणार आहे.तालुक्‍यात सर्वाधिक १९ हजार हेक्‍टरवर कपाशीचा पेरा करण्यात येणार असून सुमारे ११ हजार हेक्‍टरवर सोयाबीन पिकाची लागवड या वर्षी होण्याची शक्यता आहे.         त्या अनुषंगाने आवश्यक कपाशी व सोयाबीन बियाणांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. रासायनिक खतांमध्ये युरियाचा साठा १४५५ मेट्रिक टन उपलब्ध असून इतर एनपीएस व एनपीके खतांचा साठा सुद्धा पुरेसा उपलब्ध आहे. रासायनिक खतांची मागणी ज्याप्रमाणे होईल तेवढा साठा उपलब्ध करून देण्यात येईल. रासायनिक खतांचे महत्तम विक्री मूल्य जे आहे त्यापेक्षा जास्त भावाने कोणीही या खतांची खरेदी करू नये असे कृषी अधिकारी आर.एस.नावकर यांनी सांगितले. 

सोयाबीनची उगवण चाचणी करूनच पेरणी सोयाबीन बियाण्याची उगवण चाचणी करूनच पेरणी करावी अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.साधारणपणे ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू नये. सोयाबीन बियाण्याची उपलब्धता व त्याची किंमत लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टोकण पद्धतीने हात लागवड करावी ज्यामुळे बियाण्याची बचत होवून दोन झाडात योग्य अंतर साधता येईल. सोयाबीन पिकाची धूळपेरणी करू नये असेही कृषी विभागाने सूचित केले आहे.  

  "गुलाबी बोंड अळीची साखळी तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी कापसाची लागवड 1जुन नंतरच करावी.खते व बियाणे यांचे पक्के बिल कृषी केंद्राकडून घ्यावे व ते जपून ठेवावे.बियाण्यांची पिशवी,थोडे बियाणे हे सुद्धा सांभाळून ठेवावे. भविष्यात काही समस्या उद्भवल्यास त्याचा उपयोग होवू शकतो."-आर.एस.नावकर, कृषी अधिकारी,पंचायत समिती,जळगाव (जामोद)

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदAgriculture Sectorशेती क्षेत्र