शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारक शेतकऱ्यास २९ हजारांचा आॅनलाइन गंडा

By admin | Updated: March 31, 2017 19:32 IST

मोताळा: येथील विनोद पुंडलीक गवळी या अल्पभूधारक शेतकऱ्यास स्टेट बँकेचा अधिकारी असल्याचे भासवत "एटीएम" वरील कोड विचारून आॅनलाइन २८ हजार ९९७ रुपए बँक खात्यातून काढून फसविल्याचा प्रकर उघडकीस आला.

अर्ध्या तासात चार वेळा काढले पैसेमोताळा: येथील विनोद पुंडलीक गवळी या अल्पभूधारक शेतकऱ्यास स्टेट बँकेचा अधिकारी असल्याचे भासवत "एटीएम"  वरील कोड विचारून आॅनलाइन २८ हजार ९९७ रुपए बँक खात्यातून काढून फसविल्याचा प्रकर उघडकीस आला. या प्रकरणी पीडित शेतकऱ्यांने बँकेच्या शाखेसह पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली मात्र शेतकऱ्याला कोणताही दिलासा मिळाला नाही.या बाबत अधिक माहिती अशी की,  पिंपळपाटी येथील शेतकरी विनोद पुंडलीक गवळी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. परिस्थिती जेमतेम असून, शेलापूर ता. मोताळा येथील भारतीय  स्टेट बँकेत त्यांचे बचत खाते आहे. ३० मार्च रोजी दुपारी पाऊन वाजता त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. मी मुंबईच्या बांद्रा हेडआॅफिसमधून रोहितकुमार शर्मा बोलतो आहे, तुमच्या एटीएमची मुदत संपली आहे. तुम्हाला मुदत वाढवून पाहिजे असल्यास रजिस्ट्रेशन करावे लागेल. असे सांगून त्यांने विनोद गवळी यांना रजिस्ट्रेशनसाठी एक हजार रूपय खर्च येईल. त्यासाठी तोतया व्यक्तीने गवळी यांना एटीएमचे मागील पुढील क्रमांक विचारले. हे क्रमांक घेतल्यावर तुम्हाला एक एसएमएस येईल असे सांगितले. थोड्यावेळाने एटीएमचा "ओटीपी" (आॅनलाईन ट्रान्झक्शन पावर्ड) विचारला. गवळी यांनी तोही क्रमांक दिला. ही सर्व माहिती संबंधित व्यक्तीने विश्वासात घेऊन विचारली. मोबाइल बंद झाल्यावर गवळी यांच्या खात्यातील ४ हजार ९९९ रुपए, ९ हजार ९९९, ९ हजार ९९९ व ४ हजार रुपए काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला. मात्र गवळी यांनी मोबाइलवरील संदेश न पाहताच, शेलापूर शाखेत एटीएमची मुदत कशी संपली याबाबत चौकशी केली असता, तुमची एटीएमची मुदत संपली नाही मात्र तुमच्या खात्यातून २८ हजार ९९७ रुपए काढल्याचे शाखाधिकारी यांनी सांगितले. हा आॅनलाइन गंडविण्याचा प्रकार ऐकूण विनोद गवळी यांना धक्काच बसला. सदर शेतकऱ्याने नुकताच कापूस विकला असून, कुटुंबासाठी ज्वारी आदी धान्य खरेदी करण्यासाठी पैसे बँकेत ठेवले होते. आपली  फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर गवळी यांनी बोराखेडी पोलिस स्टेशन गाठले. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांनी ७४९१८६३६११ या तोतया व्यक्तीच्या मोबाइलवर संवाद साधून  धमकावले. सवांदादरम्यान तोतया व्यक्तीने थोड्यावेळात पैसे परत करतो असे सांगितले मात्र पैसे आले नाही. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक व व्यवहार तपासला असता, दिल्लीवरून हा प्रकार झाल्याचा अंदाज शेलापूर बँक शाखाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. या आॅनलाइन प्रकाराने शेतकऱ्यासमोर आभाळ कोसळले असून, आॅनलाईन फसवणुकीबाबत त्याला कोणताही दिलासा मिळाला नाही. पोलिसांक डूनही मदत मिळाली नसून या प्रकाराबाबत बँकेचे प्रशासनही हतबल असल्याचे दिसून आले.