शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठयासाठी आता कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:38 IST

प्रथम गाव कृती आराखडा, जिल्हा कृती आराखडा व राज्याचा कृती आराखडा होईल. 

सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला प्रती दिन दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा करण्यासाठीचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्या आराखड्यामध्ये ठरवल्यानुसारच्या उपाययोजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचेही बंधन राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ४ सप्टेंबर रोजी घातले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे पाणईपुरवठा करण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी, घरगुती वापरासाठी शुद्ध पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा केला जाईल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जल जीवन मिशनची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी बेसलाईन सर्वेक्षण करून पुढील ४ वर्षांचे नियोजन केले जाईल. प्रथम गाव कृती आराखडा, जिल्हा कृती आराखडा व राज्याचा कृती आराखडा होईल. 

स्टॅण्डपोस्टपासून घरात नळ

ज्या गावांमध्ये आधीच योजना आहेत, तसेच स्टॅण्डपोस्टपर्यंतच पाणी पोहचले तेथून नळाद्वारे घरात पाणी दिले जाणार आहे. ज्या गावांमध्ये योजना नाहीत, तेथे स्वतंत्र योजनांना मंजूरी मिळणार आहे. पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या गावांचा समावेश प्रादेशिक योजनेमध्ये केला जाईल. स्वतंत्र योजनेसाठी १८ तर प्रादेशिक योजना ३६ महिन्यांत पूर्ण कराव्या लागणार आहेत. 

पाणी व स्वच्छता मिशनची नव्याने रचनाजिल्हा परिषदेत असलेल्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची नव्याने रचना आहे. या मिशनचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर मुख्य कार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष राहणार आहेत. 

सरपंच, ग्रामसेवकाची राहणार समितीग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष म्हणून सरपंच तर सचिव म्हणून ग्रामसेवक यांच्याकडे जबाबदारी आहे. या समितीकडून नियोजन, अंमलबजावणी होईल.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा