शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता बोगस पीक विमा प्रकरणात कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:32 IST

जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीवर सोपविण्यात आलेली आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोगस पीक विमा काढणाऱ्यांवर कारवाईचे संकेत कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत. शेतकºयाचे नाव चुकीचे असेल, पीक पेरा नोंदी बोगस आढळून आल्यास जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीवर सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे पीक विम्यासाठी बोगस शेतकरी दाखवाणाऱ्यांना चाप बसणार आहे.यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले. राज्यात रब्बी हंगामाच्या पेरणीचाही टक्का वाढत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतात पाणीच असल्याने रब्बी हंगामातील उत्पादनाची अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचा पीक विमा जास्त उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतू यामध्ये बोगस शेतकºयांची भीती पीक विमा कंपन्यांना आहे. दी ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप २०१८ चे काम सोपविण्यात आले होते. दरम्यान, या कपंनीने केलेल्या छाननीदरम्यान पीक विमा योजनेत राज्यातील जवळपास १५ हजारावर शेतकरी बोगस असल्याचे आढळून आले होते. त्यामध्ये काही शेतकºयांनी एकापेक्षा अधिक वेळा विमा भरला, तर काही शेतकºयांनी दिलेली कागदपत्रे खोटी असून त्यात काही तफावतही आढळून आली होती.पीक विमा योजनेत बोगस प्रकरणाच्या कथीतस्तरावर कृषी विभागाकडून फौजदारी कारवाईचे पाऊल उचलले आहे. राज्यात २०१९-२० मधील रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे, त्या क्षेत्राच्या सात/बारा उताºयावर शेतकºयाचे नाव नसणे, सात/बारा उताºयावर नोंद क्षेत्रापेक्षा अधिकच्या क्षेत्रासाठी विमा काढणे, बोगस सातबारा व पीक पेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे आढळून आल्यास दोषींवर जिल्हा सनियंत्रण समितीच्या मार्गर्शनानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित विमा कपंनीची राहणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कुठेच बोगस पीक विमा प्रकरण आढळून आलेले नाही. रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक पार पाडली जाईल.-नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमा