शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

अंशदान नवृत्ती वेतन योजनेची कार्यवाही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:36 IST

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षकांच्या पगारातून एकूण वेतनाच्या दहा टक्के कपात दरमहा  केली जात आहे;  परंतु शासनाने तेवढेच अंशदान त्यामध्ये जमा न  केल्याने शिक्षकांना याबाबतचे हिशेब अप्राप्त आहेत. त्यामुळे  संबंधित शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, डीसीपीएस  कपातीची ही रक्कम असुरक्षित तर होणार नाही ना, अशी भीती  शिक्षक वर्गात निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे‘डीसीपीएस’ची शिक्षकांकडून कपातपण शासनाचे अंशदान शून्य

नानासाहेब कांडलकर। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : जुनी पेन्शन योजना शासनाने बंद करून नवीन  परिभाषित अंशदान नवृत्ती वेतन योजना १ नोव्हेंबर २00५ पासून  अमलात आणली. योजना अमलात येऊन तब्बल १२ वर्षांचा  कालावधी उलटला असला, तरी या योजनेची अंमलबजावणी  पूर्णत्वाला गेली नाही. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षकांच्या पगारातून एकूण वेतनाच्या दहा टक्के कपात दरमहा  केली जात आहे;  परंतु शासनाने तेवढेच अंशदान त्यामध्ये जमा न  केल्याने शिक्षकांना याबाबतचे हिशेब अप्राप्त आहेत. त्यामुळे  संबंधित शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, डीसीपीएस  कपातीची ही रक्कम असुरक्षित तर होणार नाही ना, अशी भीती  शिक्षक वर्गात निर्माण झाली आहे.मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च  माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १00 टक्के अनुदानित  पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी परिभाषित  अंशदान नवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्ध तीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासकीय आदेश २९  नोव्हेंबर २0१0 रोजी काढण्यात आला. त्यानुसार १ नोव्हेंबर  २00५ नंतर नियमित शिक्षक म्हणून रुजू असलेल्यांच्या पगारातून  एकूण वेतनाच्या १0 टक्के रक्कम गत दीड वर्षांपासून कपात  करणे सुरू झाले. संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा ज्या  तारखेपासून नियमित झाला, त्या तारखेपर्यंत कपात व्हावी,  यासाठी प्रत्येक महिन्यात चालू व मागील अशा दोन कपाती सुरू  झाल्या. शिक्षकांनी शासनाच्या आदेशाचा मान राखत डीसीपीएस अकाउंट  नंबर काढून या कपातीला संमती दिली; परंतु जेव्हा दीड वर्षे  उलटूनही त्याचा हिशेब संबंधित शिक्षकांना प्राप्त झाला नाही,  त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या हिशेबाच्या  पावत्या शिक्षकांना न मिळण्याचे कारण असे समजते, की अद्याप  शासनाने आपले अंशदान संबंधित शिक्षकांच्या खात्यात जमा  केले नाही. ते केव्हा जमा होणार, याबाबत अधिकारीवर्गही  अनभिज्ञ आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना तर सोडाच; परंतु  नवीन परिभाषित अंशदान नवृत्ती वेतन योजनेतूनसुद्धा नवृत्तीनं तरची उदरनिर्वाहाची सोय होणार की नाही, असा संभ्रम  शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व कर्मचारी यांचीही स्थिती  सारखीच आहे. डीसीपीएस कपाशतीच्या विरोधात काही  शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून स्थगनादेश मिळविला.  जुनी पेन्शन योजना लागू करावी, असा दावा न्यायालयात पेश  करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय स्तरावर शासनाचे  अंशदान वर्ग करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात  असले, तरी ही सबब योग्य नाही. शिक्षकांच्या असंतोषाचा उद्रेक  होण्यापूर्वी शासनाने परिभाषित अंशदान नवृत्ती वेतन योजनेची  कार्यवाही वेगाने करून संबंधित शिक्षकांना हिशेबाच्या पावत्या  देणे गरजेचे आहे.

‘डीसीपीएस’चे रूपांतर ‘एनपीएस’मध्येडिफाइन कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम (डीसीपीएस)चे रूपांतर  आता भारत सरकार निर्मित नॅशनल व पेन्शन सिस्टीम (एन पीएस)मध्ये होत आहे. महसूल कर्मचार्‍यांबाबत त्याची  अंमलबजावणी झाली आहे. महसूल कर्मचार्‍यांना एनपीएसचे  ओळखपत्र व खाते क्रमांक मिळाला असून, त्यांना त्यांचा हिशेब  आता ऑनलाइन पाहता येतो. एनपीएस खात्यामध्ये शासनाचा  शेअरदेखील जमा होत आहे. ही पद्धत शिक्षकांसाठी मात्र अद्याप  लागू झाली नाही. त्यामुळे डीसीपीएसच्या कपातीवर ना व्याज, ना  शासनाचे अंशदान, ना हिशेबाच्या पावत्या अशी स्थिती शिक्षक  वर्गाची झाली आहे. याबाबतचा गुंता शिक्षण विभागाने त्वरित  सोडविण्याची मागणी शिक्षक संघटनांची आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक