शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

३५ लाख घेऊनही मका न देणाऱ्या तिघांवर कारवाई; तिसऱ्या आरोपीला गुरुवारी अटक

By सदानंद सिरसाट | Updated: October 20, 2023 14:52 IST

न्यायालयाने दिला जामीन

मलकापूर (बुलढाणा) : शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात एका व्यापाऱ्याला ३५ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार पोलिस तपासात निष्पन्न झाला आहे. तीन भागीदारांनी फसवणूक केल्याने मलकापूर शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज अग्रवाल याला गेल्या काळात प्रथम अटक व जामीन, तर संतोष अग्रवाल याला अटकपूर्व जामीन मंजूर मिळाला. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी राजेश गांधी याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उपस्थित केले असता जामीन मंजूर झाला आहे.

शहरातील श्रीकृष्ण सुभाष मोरे यांनी १ नोव्हेंबर २०२२ रोजी या घटनेची तक्रार दिली होती. त्यामध्ये पंकज बन्सीलाल अग्रवाल (जय गणेश ट्रेडर्स), राजेश गांधी (संकल्प ट्रेडर्स), संतोष गिरधारीलाल अग्रवाल (शाकंबरी जिनिंग अँड प्रेसिंग) या तिघांनी भागीदार असल्याचे सांगितले होते. मका विक्री करण्याच्या नावाखाली ३५ लाख रुपयांच्या मोबदल्यात मका पाठवला नाही, त्यामुळे फसवणूक केल्याचे म्हटले.

तक्रारीनुसार मलकापूर शहर पोलिसांनी तिघांवर भादंविच्या कलम ४२०, ४०९ नुसार गुन्हा दाखल केला. तर, पंकज अग्रवाल याला अटक केली. अधिक तपासात मुख्य आरोपी पंकज अग्रवाल व साक्षीदार संदीप यांच्या जबाबातून तसेच दिलेल्या रक्कमेचे ‘सेम डे हस्तांतरण’ या आधारे प्रकरणात राजेश गांधी व संतोष अग्रवाल हे दोघेही पंकज अग्रवाल यांचे भागीदार असल्याचे निष्पन्न झाले. तरीही रकमेच्या मोबदल्यात मका दिला नसल्याचे पुढे आले. प्रकरणाचा तपास ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय स्मिता म्हसाये यांनी केला.अशी झाली फसवणूक

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे पंकज अग्रवाल, राजेश गांधी, संतोष अग्रवाल हे तिघे भागीदार असल्याची तोंडी बतावणी केली. तक्रारदार श्रीकृष्ण मोरे यांनी पंकज अग्रवाल यांच्यासोबत व्यवहार करून मका खरेदी करण्यासाठी त्यांच्या जय गणेश ट्रेडर्सच्या खात्यात ३५ लाख रुपये हस्तांतरीत केले. तरीही मका देण्यात आला नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार होती.