१५ जुलै रोजी या प्रकरणातील ५ ही आरोपींना बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बुलडाणा न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. गिरडा परिसरात चार विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाइल, रोख पैसे लुटल्याप्रकरणी भूषण रमेश राठोड (२३, रा. डीपी कॉलनी, सिव्हिल लाइन, वाशिम) याने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी आरोपी समीर जलाल बागुल, आमिर शेख खाबरडे, सुलतान दिलवार बरडे, मजीद जुम्मा तडवी यांना अटक केली होती. सोबतच या आरोपींकडून चोरीचे मोबाइल घेणाऱ्या पहूर पेठ (जि. जाळगाव खान्देश) येथील पाचवा आरोपी अफसर अकबर तडवी यासही अटक केली होती. या आरोपींची १७ जुलै रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST