शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपीस केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 11:42 IST

Crime News २२ वर्षीय चोरट्यास बुलडाणा  पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मराठवाड्यासह बुलडाणा जिल्ह्यात घरफोडीसह चोरीच्या गुन्हे करणाऱ्या एका २२ वर्षीय चोरट्यास बुलडाणा  पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याच्या विरोधात जालना, अैारंगाबाद, नांदेड आणि बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २२ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अट्टल गुन्हेगार असलेल्या दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक याच्या अटकेमुळे बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अनेक घरफोड्यांचा छडा लागण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.सुंदखेड येथील मेडिकल फोडून दीपकसिंगने ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी त्यांला जालन्यातून अटक केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी शहरानजीकच्या सुंदरखेड  येथील एक मेडिकल फोडण्यात आल्याचे उघड झाले होते. यात रोख सात हजार रुपये, लॅपटॉप व अन्य साहित्य असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी माळविहीर येथील स्वप्नील सोनोने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा