शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हिजन डॉक्युमेंटनुसार ग्रामविकासाने घेतला वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:58 IST

जिल्ह्या तील ८६९ ग्रामपंचायतींनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले होते. या व्हिजन डॉ क्युमेंटचे अवलोकन केल्यानंतर त्यास मान्यता दिल्यामुळे आतापर्यंत एकूण सात ह प्त्यात जवळपास १८0 कोटीचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्राम पंचायतींच्या ग्रामविकासाने वेग घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींचा समावेश सात हप्त्यात मिळाला १८0 कोटींचा विकास निधी

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू केलेल्या ‘आमचं गाव आमचा विकास’ या हि तकारक योजनेंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून शाश्‍वत ग्रामविकास होण्याच्या  दृष्टिकोनातून भरघोस निधी देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्या तील ८६९ ग्रामपंचायतींनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले होते. या व्हिजन डॉ क्युमेंटचे अवलोकन केल्यानंतर त्यास मान्यता दिल्यामुळे आतापर्यंत एकूण सात ह प्त्यात जवळपास १८0 कोटीचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्राम पंचायतींच्या ग्रामविकासाने वेग घेतला आहे. महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली पंचायत समिती  कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय आदी प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था व या  प्रणालीतील सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी संयुक्तपणे  बुलडाणा जिल्ह्यातील  ८६९ ग्रामपंचायतींमध्ये ‘आपलं गाव, आपला विकास’ उपक्रम राबविण्यात आला.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २२ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान विविध  उपक्रम घेऊन विकासाचा नियोजन आराखडा तयार करून पंचायत समितीकडे  पाठविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात तीन दिवसांचा सूक्ष्म  नियोजन कार्यक्रम राबविण्यात  आला असून,   आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, पशुसंवर्धन आदींचे सूक्ष्म नियोजन  करण्यात आले. सदर नियोजन आराखडा मंजूर झाल्यानंतर आतापर्यंत एकूण सात हप्त्यात १८0  कोटीपर्यंत निधी वितरित करण्यात आला आहे, त्यामुळे गाव विकासाने वेग घेतला  असून, येणार्‍या काळात त्यांचे चांगले परिणाम दिसून येणार आहेत. यासाठी गावाचे  सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पशुधन पर्यवेक्षक, आशा वर्कर, आरोग्य  सेवक, सेविका, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, तलाठी,  युवक-युवती गट,  ग्रामसेवक, बचत गटातील सदस्य, अध्यक्ष, कृषी सहायक, जल सुरक्षक,  मु ख्याध्यापक, शिक्षक, ग्रामरोजगार सेवक, वनपाल, स्वयंसेवक, ग्रामपंचायत  सेवक, संगणक सेवक यांसह ग्रामपंचायतीच्या सर्व समित्यांचे सदस्य परिश्रम घेत  आहेत.

असा वाटप करण्यात आला गाव विकास निधीव्हिजन डॉक्युमेंटचे अवलोकन केल्यानंतर त्यास मान्यता दिल्यामुळे आतापर्यंत  एकूण सात हप्त्यात जवळपास १८0 कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे.  त्यात पहिल्या हप्त्यात २७ कोटी ४ लक्ष ४४ हजार ६२३, दुसर्‍या हप्त्यात २६ कोटी  ७६ लक्ष, तिसर्‍या हप्त्यात ३७ कोटी २६ लक्ष ६७ हजार ३४७, चवथ्या हप्त्यात  ३७ कोटी ९ लक्ष २0 हजार ४८६, पाचव्या हप्त्यात ६ लक्ष १७ हजार तसेच  सहाव्या हप्त्यात १३ कोटी ११ लक्ष ५४ हजार १४ रूपयाचा निधी वितरित करण्या त आला आहे. याशिवाय चांगले काम करणार्‍या ग्रामपंचायतींना यावर्षी प्रोत्साहन पर निधी म्हणून ९ कोटी ७२ लाख ६२५ रुपयांचा निधी देण्यात आला आहे.  त्यामुळे अनेक गावातील विकास कामांनी वेग घेतला आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय